मातोश्रीच्या हस्ते स्व.सतीश भाऊ बयास यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि शाह डेव्हलोपर्स या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

पुसद :येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिवंगत स्व.सतीश भाऊ बयास यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि शाह डेव्हलोपर्स या कार्यालयाचे उद्घाटन “गुरुकृपा रेसिडेन्सी पुसद”येथील शानदार कार्यालयात मनीष भाऊ शाह यांच्या मातोश्रीच्या शुभ हस्ते पार पडले . 
“कौशल्य माझ्यात इतके नाहीत की तुझ्या हृदयात घर करून राहील मी.पणं,विसरणे तुला अशक्य होईल येवढ्या आठवणी सोडून जाईल मी.”दिवंगत स्व.सतीश भाऊ बयास यांना आपल्यातून जाऊन आज जवळ जवळ एक वर्ष पूर्ण होत आली असून त्यांचे* *विचार आणि सामाजिक कार्याची आठवण त्यांच्या हजारो चाहत्याला कायम प्रेरणा देत चिरकाल स्मरणात राहील.
या लौकिक जगात आई वडील मुलगा,मुलगी,भाऊ बहिणी पती पत्नी अशी सर्व नाती असतात त्या पैकी गुरु – शिष्य सुध्दा एक नाजूक नाते आहे.गुरूंना समर्पित* *झाल्या नंतर संपूर्ण आयुष्य त्यांच्याशी प्रामाणिक राहून परम विनयापर्यंत पोहचणारे मनीष भाऊ शाह खऱ्या गुरू आणि शिष्याची नाती काय असते याचे सुंदर उदाहरण आजच्या आपल्या कार्यालयातील स्व.सतीश भाऊ बयास यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी लक्षात आले.गरिबाच्या परिस्थिची परीक्षा घेणारे आणि स्वतःला खूप मोठे समाज सेवक असल्याचा भास निर्माण करणाऱ्या ढोंगी आणि दुष्ट मंडळी कडून कार्यालयाचे उद्घाटन व गुरुतुल्य पुतळ्याचे अनावरण करून न घेता आपल्या निष्ठावंत आणि मोजक्या निवडक मित्र मंडळीच्या साक्षीने वात्सल्य सिंधू आद्यगुरू आपल्या मातोश्रीच्या पवित्र हस्तस्पर्शाने फित कापून आपल्या कार्यालयाचे आणि पुतळ्याचे अनावरण करून घेतले ही बाब प्रत्येक आई पुत्राला प्रेरणा देणारी अभिमानाची आणि अनुकरणीय राहील.
आज आपल्या आईच्या हस्ते उद्घाटन प्रसंगी “तुझ आहे तुझं पासी ,परंतु जागा विसरलासी.” या वोवीची आवर्जून आठवण झाली. मनीष भाऊ शाह यांच्या अंगी शोधक प्रवृत्ती बरोबरच ते एक उत्कृष्ट व्यावसायिक त्याच बरोबर व्यवसायाचा अचूक वेध घेणारा एक यशस्वी व्यक्तिमत्व आणि सामाजिक कार्याची जाणीव असलेला गोर गरीब जनतेच्या अडचणीच्या प्रसंगी अगदी सढळ हाताने मदत करणारा गरीब ,गरजू लोकांच्या मदतीला सदैव तत्पर राहणारा,गरिबाच्या मुक्या वेदना जाणून घेण्याचं सामर्थ असणार! एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून मनीष भाऊ शाह यांची अमिट छाप आपल्या हजारो चाहत्यांच्या मनावर निर्माण केलेली आहेत.मनीष भाऊ तुमच्या कार्याला माझा आणि तुमच्या हजारो निष्ठावंताचा हृदयस्पर्शी सलाम.



