ईतर

अक्षय भालेराव खुन प्रकरणातील आरोपींवर तात्काळ कडक कारवाई करा:काळी (दौ) येथील नागरिकांचे ठाणेदारांना निवेदन!

महागाव/प्रतिनिधी:नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली या गावात १ जून च्या संध्याकाळी काही समाजकंटक तरुणांनी अक्षय भालेराव या युवकाची निर्घुन हत्या केली होती. या प्रकरणी दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी काळी दौ येथील नागरीकांनी पोलीस चौकीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश चावढीकर यांना निवेदन दिले.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. नांदेड जिल्हातील (बोन्डार) हवेली या गावात १ जूनच्या सायंकाळी अक्षय भालेराव या तरुणाची काही माथेफिरू नागरिकांनी हत्या केली कारण होते त्याने एवढ्या वर्षात प्रथमच गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली मराठवाड्यात नांदेड शहरा लागून असलेल्या या गावात अशी घटना घडली. असे एकूण मान शरमेने खाली जाते. आजच्या काळातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीचे वाद होतात आणि कुणाच्या निष्पाप रक्ताने त्यांचा शेवट होतो. ही बाब अतिशय चुकीचे आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हावी व दोषीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदनावर शेख अशफाक, संदेश कुलदिपके, राजू रणविर, महेन्द्र राऊत, बंडु खंदारे, उज्वल रणवीर, किशोर आळणे, गजानन राऊत, मनीष राऊत, शेख रजजाक, समाधान दवने, मंगेष साखरकर, गजानन गरडे, गोपाल कांबळे, रितेश लांडगे, पंकज बगाटे, अजय इंगोले, विक्रम रणवीर, संदिप साळवे, विश्वजीत बगाटे, प्रदिप मिरासे ,अरविंद गरडे, प्रितम बगाटे, विपुल रणविर, इंद्रजित कुलदिपके, विजय गायकवाड, तथागत गायकवाड, आदीचे सहया आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close