दु:खद बातमी : ग्रामसेवक संघटना यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम राठोड यांना पितृशोक; प्रल्हाद राठोड माजी पोलीस पाटील लोहरा ई यांचे निधन!

पुसद: तालुक्यातील लोहरा ई येथील व ग्रामसेवक संघटना यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम राठोड यांचे वडील प्रल्हाद राठोड (वय ७२) यांचे काल रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज शुक्रवार दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाचण्याच्या सुमारा अंत्यसंस्कार करण्यात आले.ग्रामसेवक संघटना यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष व पुसद तालुका ग्रामसेवक संघटनेचे माजी अध्यक्ष तुकाराम राठोड यांना पितृशोक झाला आहे. त्यांचे वडील प्रल्हाद राठोड यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले आहे. प्रल्हाद राठोड हे लोहरा ईजरा येथील माजी पोलीस पाटील असल्याने सर्वदूर परिचित होते.प्रल्हाद राठोड यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी १०-३० वाजता लोहरा ईजरा येथील त्यांच्या शेतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली,सूना, नातवंडे असा मोठा अपत्य परिवार आहे.



