ईतर

महामंडळाच्या भंगार बसमुळे प्रवाशांना मनस्ताप; भंगार बस कडे वरिष्ठाचा कानाडोळा!

पुसद: महामंडळाच्या स्थानकाची बस पोखरी वरुन वापस येताना शहरातील पीएन कॉलेज जवळ रस्त्यावर आधीच खिळखिळी झालेली एसटी त्यात आता टायर पंक्चर होण्याचे प्रकार वाढलेले दिसून येत आहेत. अनेकवेळा टायर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. टायर व ट्यूबचा वेळेवर पुरवठा न झाल्यास जुन्याच टायरवर बस सोडल्या जाते परिणामी ऐनसणासुदीच्या काळात याचा प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.पुसद आगारात भंगार बसेस असल्याची नेहमी ओरड होते.एसटी बसगाड्यांची अवस्था दयनीय झाली आहे.बसेसना खराब टायर लावून बस मार्गस्थ केल्या जात असल्याने टायर वारंवार पंक्चर होण्याचा धोका वाढला आहे. बसचा टायर पंक्चर झाल्यास  प्रवाशांचा रोष चालक व वाहकांवर येतो. बसेसना टायरचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने जुनेच टायर वापरावे लागत आहेत. काही टायर तर पूर्ण गुळगुळीत झाले आहेत. तर अनेकदा बस बंद पडण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. आज१५ नोव्हेंबर रोजी एम. एच.०७ सि.९२८९ नंबरची पुसद पोखरी बस पुसद आगारातून सुटली. परंतू ही बस पोखरी वरुन वापस येताना पी एन कॉलेज जवळ भर रस्त्याच्या बाजूला उभी करण्याची नामुष्की चालकावर आली. याचा नाहक त्रास प्रवाशांना सोसावा लागला. प्रवासी बसमध्ये ताटकळत बसून दुसर्‍या बसची वाट पाहत होते. त्यामुळे एस टी महामंडळाने प्रवाशांच्या जीवाशी खेळणे बंद करावे अन्यथा प्रवाशांना व नागरिक एसटी महामंडळाविरुद्ध रस्त्यावर उतरावे लागेल अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवासी देत आहे, एसटी महामंडळाने ही वेळ येऊ देऊ नये व प्रवाशांना चांगल्या बसेस उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.तरीही वरिष्ठ अधिकार्‍यांचा कानाडोळापुसद शहरात दर दिवसाला किमान एक ना एक बसगाड्या बंद पडलेल्या दिसतील. त्यामुळेप्रवाशांना नाहकत्रास सहन करावा लागल्याचे चित्र नेहमी दिसत असते. एसटीच्या प्रवासीसेवेचा हा बट्याबोळ झालेला आहे. एसटीचा सर्वात महत्वाचा घटक प्रवाशी आहे. तो नाडावला जातोय, याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांचा कानाडोळा केला आहे. त्यामुळे एसटीचे नुकसान होत आहे. एसटीच्या गाड्यांमधून जो धुर निघतोय, हे तर पर्यावरण प्रदूषण वाढीला हातभार लावणारे आहे. त्यामुळे या भंगार बस गाड्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close