राजकिय

सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चं वादळ;एका मराठी तरुणाने मस्करीतून सुरू केलेली ‘सिजेपी’ लाखो तरुणांचा आवाज बनत चालली.?

झुरळ...हे नाव प्रचंड ट्रेंडिंग मध्ये असून या नावाने अनेकांची झोप उडविली!

पुसद:सध्या महाराष्ट्रातील एका मराठी तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार केलेल्या कॉकरोच जनता पार्टी हे नाव सध्या डिजिटल क्षेत्रात खूपच चर्चेत आहे. लोक त्यावर रील्स बनवत आहेत, जोक्स करत आहेत, मीम्स शेअर करत आहेत, तर काही जण टीकाही करत आहेत.तर लोकशाहीवर विश्वास ठेवणारा भारतातील तरुणांना व्याक्त होण्यासाठी एक मोठा डीझीटल प्लाटफार्म मीळाल्याने समधान व्यक्त करीतआहेत.त्यामुळे भारतातील तरुणांच्या अस्वस्थतेचा डिजिटल चेहरा म्हणून कॉक्रोच पार्टीकडे हे तरुण सोशल मीडिया ट्रेंडपुरतं मर्यादित नपाहता उद्याच्या नवभारताचे स्वप्न म्हणून सोशल मीडिया हँडल्सला लाखो नेटकरी फॉलो करत आहेत.अन् नेटकरी सोशल मीडियावर या पक्षाला भरपूर पाठिंबा देताना दिसत आहेत.त्यामुळे महाराष्ट्राच्या या तरुणांने देशांतच नव्हे तर जगात महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या व्यंगात्मक मोहिमेची सुरुवात भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका कथित मौखिक टिप्पणीपासून झाली. १५ मे २०२६ रोजी बनावट पदवी प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही बेरोजगार युवक ‘कॉकरोचप्रमाणे व्यवस्थेत घुसतात’ अशा आशयाची टिप्पणी केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. सरन्यायाधीशांनी भारतीय बेरोजगार युवकांना झुरळ यावरुन एक विधान केले होते. त्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले ही टिप्पणी सर्वसामान्य बेरोजगार युवकांसाठी नसून बनावट पदवीधारकांसाठी असल्याचे म्हटलं होतं. परंतु देशातील राजकारणाच्या कारभाराची परिस्थिती पाहता नव्या पिढीला हिंदू-मुस्लिम, जात-पात हे सगळे भेद नको आहेत. त्यांना चांगलं शिक्षण, रोजगार आणि नवनवीन तंत्रज्ञान हवं आहे. महिलांना आरक्षण हवं आहे हे सगळं असताना धर्माच्या नावावर देशाचं विभाजन करणाऱ्यांना विरुद्ध अनेक वर्षं साचलेला राग  यामाध्यमातून बाहेर येत आहे.आणि नीट पेपर लीक, बेरोजगारी आणि स्पर्धा परीक्षांमधीलनव्या पिढीला हिंदू-मुस्लिम, जात-पात हे सगळे भेद नको आहेत. त्यांना चांगलं शिक्षण, रोजगार आणि नवनवीन तंत्रज्ञान हवं आहे. महिलांना आरक्षण हवं आहे हे सगळं असताना धर्माच्या नावावर देशाचं विभाजन करणाऱ्यांना विरुद्ध अनेक वर्षं साचलेला राग आहे.या गोंधळामुळे आधीच नाराज असलेल्या युवकांच्या भावना लक्षात घेऊन अभिजीत दीपके यांनी १६ मे रोजी X वर एक व्यंगात्मक पोस्ट केली. “जर सगळे कॉकरोच एकत्र आले तर?” असा प्रश्न विचारत त्यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाची वेबसाइट आणि गूगल फॉर्म सुरू केला. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर एका खास उपहासात्मक ट्रेंडची चर्चा आहे. ते चर्चेच्या केंद्रस्थानी असुन ‘कॉक्रोच जनता पार्टी पेज सोशल मीडियावर ट्रेंड करीत असुन अल्पवधीतच याचे ५०लाखाच्यावर फॉलोवर्स झाले आहे.मूळचा छत्रपती संभाजीनगरच्या एका मराठी तरुणाने अमेरिकेच्या बोस्टनमध्ये बसून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नावाने एक वेबसाईट, इंस्टाग्राम हॅन्डल आणि एक्सचं खातं बनवलं. आणि बघता बघता संपूर्ण देशभर ही कॉक्रोच जनता पार्टी अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरली आहे.अभिजीत दीपके हा मराठी तरुणांनाला सोशल मीडिया कॅम्पेन आणि राजकीय संदेश व्हायरल करण्याचा अनुभव असल्याचे सांगितले जाते. २०२० ते २०२२ या कालावधीत ते आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते.सुरुवातीला केवळ विनोदी आणि व्यंगात्मक स्वरूपात सुरू झालेल्या या ऑनलाइन मोहिमेला अल्पावधीत मोठा प्रतिसाद मिळाला असून, तीन दिवसांतच लाखाहून अधिक युवक या अभियानाशी जोडले गेल्याचा दावा केला जात आहे. तसेच इन्स्टाग्रामवर या पेजचे २० लाखांहून अधिक फॉलोअर्स जोडल्याची चर्चा आहे.अभिजीत दीपके हे व्यावसायिक पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट म्हणून ओळखले जातात. त्यांनी पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. नुकतीच त्यांनी अमेरिकेतील Boston University मधून पब्लिक रिलेशन्स (PR) विषयात मास्टर ऑफ सायन्स (MS) पदवी पूर्ण केली आहे.याशिवाय ते दिल्ली शिक्षण विभागात कम्युनिकेशन ॲडव्हायझर म्हणूनही काम पाहत होते. सोशल मीडियाची भाषा, तरुणांची मानसिकता आणि इंटरनेटवरील ट्रेंड्स यांची त्यांना चांगली जाण असल्याचे मानले जाते.या संपूर्ण व्हायरल मोहिमेच्या केंद्रस्थानी आहेत अभिजीत दीपके हे ३० वर्षीय तरुण. बेरोजगार तरुण, सोशल मीडियावर सतत सक्रिय असलेले युवक आणि व्यवस्थे विरोधातील नाराजी व्यंगात्मक पद्धतीने आवाज देण्याचा प्रयत्न या मोहिमेतून होत असल्याचे मानले जात आहे.अभिजित दिपके यांच्याशी विविध माध्यमांच्या प्रतिनिधीशी चर्चा केली आहे आणि अशा प्रकारचा उपक्रम हाती घेण्यामागची त्यांची भूमिका काय आहे हे समजून घेतले.इंस्टाग्रामवर अल्पवधीतच दिवसांत ५० लाख फॉलोअर्स आहेत. २ लाखांहून अधिक लोकांनी वेबसाईटवर सदस्यत्वासाठी नोंदणी केली असल्याची सूत्राची माहिती आहे.झुरळ…या नावाने अनेकांची झोप उडविली असून भारतात सध्या हे नाव प्रचंड ट्रेंडिंग करीत असून लाखो बेरोजगार युवक याचा भाग बनत चालले आहे.

१ – कोणत्याही मुख्य न्यायमूर्तीला निवृत्तीनंतर राज्यसभेचं पद दिलं जाणार नाही.

२ – जर कोणाचंही वैध मत हटवलं गेलं, तर मुख्य निवडणूक आयुक्तांवर UAPA अंतर्गत कारवाई केली जाईल.

३ – महिलांना ५०% आरक्षण दिलं जाईल आणि मंत्रिमंडळातील ५०% पदं महिलांसाठी राखीव ठेवली जातील.

४ – खोटी माहिती देणाऱ्या वृत्तमाध्यमांवर कारवाई केली जाईल.

५ – पक्षांतर करणाऱ्या आमदार आणि खासदारांवर २० वर्षांची निवडणूक बंदी घातली जाईल…त्यामुळे राजकारणात येऊ पाहणाऱ्या भारतातील तरुणांना नवा राजकीय पर्याय उपलब्ध होणार असल्याचे चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close