ईतर

पुसद येथे नमो ग्रुप व नरेंद्र मोदी विकास मिशनच्या वतीने भाजपचा ४६ वा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा!

पुसद:  येथील नमो ग्रुप व नरेंद्र मोदी विकास मिशनच्या वतीने भारतीय जनता पक्षाचा ४६ वा वर्धापन दिन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दीपक सिंह परिहार ॲड. विश्वास भवरे, अश्विन जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद जिल्हेवार, नारायण मुडाणकर, रमेश सोमानी, गोविंद कुकडे, नारायण गायकवाड, संतोष आर्य, देविदास डोळस, मुकेश व डॉ. रूपालीताई जयस्वाल यांचा मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठांचा भव्य सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पुष्प वाहून पूजाअर्चा करण्यात आली.

तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या निनादात जल्लोष साजरा करण्यात आला. व याप्रसंगी उपस्थित नागरिकांना नमो ग्रुप तर्फे मिठाईचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद जिल्हेवार, अजय पुरोहित, एड. विश्वास भवरे यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी माधवराव वैद्य,श्रीकांत नरसिंग, अमोल मुडाणकर, ओमप्रकाश शिंदे, वैभव उबाळे, अक्षय थोटे, शैलेश मुदीराज, हेमंत आंबोरे, आकाश खडसे, शेखर वानखेडे, नटवर उंटवाल, संतोष चोपडे, सुरेश तिवारी, विक्रांत जिल्हेवार, सुरज कुरील, संजय ठाकरे, किरीट चव्हाण, शिवाजी थोरात, राम निकम, गजानन कांबळे, राजेश आळणे, विजय गजभार, धीरज ढोले, रमेश खंदारे, सिद्धार्थ कांबळे, रुद्र परिहार, हितेश बोथरा, बाळासाहेब मैराळ, बाळा खंदारे, अमोल पैठणकर, मानस पैठणकर, विलायतकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close