शेतीचा रस्ता मोकळा करून न दिल्याने प्रशासनाच्या त्रासाला कटांळून स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न!

पुसद:आज तालुक्यातील माळ पठारावरील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेलोरा येथील काही शेतकऱ्यांचा गावातील एका धनदांडग्यां शेजारील शेतकऱ्यांनी शेतीच्या रस्त्यांवर कायमस्वरूपी अतिक्रमणे केल्याने गावातील अनेक शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे,खते -बियाणे नेणेआणि शेतमाल घरी व बाजारात आणने कठीण होवु बसले आहे त्यामुळे या शेतकऱ्यांनी वांरवार संबंधित प्रशासनाकडे तसेच न्यायालयात सुध्दा दाद मागितली होती त्यावेळी संबंधित प्रशासनाने व न्यायालयाने सुद्धा या शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला तसेच राज्य सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी आणि शेतमालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत विशेष मोहीम हाती घेतली आणि शेतकऱ्यांसाठी पांदण/विवादीत रस्ते खुले करून देण्यासाच्या विकासावर मोठा जोर देणे असुन महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात येत असताना मात्र कींवा वरीष्ठ पातळीवरुन आदेश निघुन ही स्थानिक प्रशासन पातळीवर तलाठी, मंडळ अधिकारी, आणि तहसीलदार हे मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत असुन कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने बेलोरा गावातील काही शेतकऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी (दि.१५) ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडताच तहसील कार्यालयाच्या प्रांगणात अंगावर ज्वलनशील पदार्थ घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
मात्र सर्तक पोलिसांच्या प्रसंगावधाने मोठा अनर्थ टळला मात्र शेतकऱ्यांनी केलेला आक्रोश उपस्थितांना हेलावून टाकणारा होता.तर या घटनांनी महसूल प्रशासनावरील जनतेचा रोष आणि तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष अधोरेखित झाले आहे.
एकीकडे देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करीत असताना तालुक्यातील माळ पठारावरील बेलोरा बु.गावातील शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात जाण्यासाठी न्यायालयीन लढाई जिंकूनही हक्काचा रस्ता मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
राज्य सरकार ग्रामीण भागातील नागरिकांना पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सुलभ वाहतुकीसाठी ‘पाणंद रस्ते’ (शेत रस्ते) खुले करण्यावर व त्यांच्या नूतनीकरणावर विशेष भर देत आहेत तर शासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना’ मोठा गाजावाजा सुरू केला आहे तर याच शासनाच्या आदेशाला स्थानिक संबंधित महसूल प्रशासन केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप शेतकरी करीत असून शेतरस्ते मोकळे न झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे, खते-बियाणे नेणे आणि शेतमाल बाजारात आणणे कठीण होऊन बसले आहे.
वरिष्ठ पातळीवरून आदेश निघूनही स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्यानेतहसीलदार, उपविभागीय अधिकारी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापर्यंत लढाई देऊन या सर्वांनी पिडित ग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देवून ही शेतीचा रस्ता मोकळा न केल्याने आज स्वातंत्र्यदिनी या शेतकऱ्यांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडताच तहसील कार्यालयाच्या प्रांगणात अंगावर ज्वलनशील पदार्थ घेऊन सर्व कुटुंबीयांसह सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला.
मात्र सर्तक पोलिसांच्या प्रसंगावधाने मोठा अनर्थ टळला या शेतकऱ्यांनी यापूर्वी नामदेव किसनराव गडदे व इतर शेतकऱ्यांच्या वतीने संबंधित प्रशासनाला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिला होता.
तसेच या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी असलेल्या एकमेव वहिवाटीचा रस्ता गावातील एका धनदांडग्यांनी आडवुन शेजारील अतिक्रमणे केली होते तो रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी या शेतकऱ्यांनी पुसद तहसीलदार पुसद यांच्याकडे दाद मागितली होती. तहसीलदारांनी १९ जून २०२४ रोजी रस्ता खुला करून देण्याचा आदेश दिला होता.
या आदेशाविरुद्ध संबंधितांनी अपील दाखल केले होते त्यावेळी उपविभागीय अधिकारी, पुसद यांनी १२ जून २०२५ रोजी नामंजूर करून तहसीलदारांचा आदेश कायम ठेवला होता. त्यानंतर संबंधित अतिक्रमण धारकांनी हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका क्र. ३३४८/२०२५ द्वारे दाखल केले होते आणि उच्च न्यायालयाने सुद्धा संबंधित महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रस्त्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देवून या शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला तरीही या शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी रस्ता मोकळा करुन न दिल्याने या शेतकऱ्यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलले असून 
देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके झाली तरीही हे शेतकरी मात्र प्रशासकीय कायदे, जाचक नियम आणि दप्तरदिरंगाईच्या विळख्यात अडकलेला आहे.
यालाच ‘प्रशासकीय गुलामगिरी’ आहे असा प्रश्न हे शेतकरी उपस्थित करु लागले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वांतत्र्याची लढाई अजुनही सुरूच आहे.यामुळे या स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले असून न्यायालयाच्या आदेशाला सुद्धा 
संबंधित महसूल प्रशासनातील स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार केराची टोपली दाखवत असुन कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने 
नामदेवराव गडदे, शिवाजी ढाले, जांबुवतराव मस्के, स्नेहा अरविंद गडदे, नथ्थूजी नारायण ढाले, यमुना नथ्थूजी ढाले, रंगराव मस्के, नथ्यूजी जामकर, कपील जैन, अरविंद नामदेव गडदे, कल्पना प्रशांत गडदे अदिनी आज स्वातंत्र्यदिनी (दि.१५) ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडताच तहसील कार्यालयाच्या प्रांगणात अंगावर ज्वलनशील पदार्थ घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र सर्तक पोलिसांच्या प्रसंगावधाने मोठा अनर्थ टळला
यावेळी या सर्व शेतकऱ्यांना शहर पोलीस ठाण्यात ताब्यात घेऊन समज दिली व संबंधित महसूल प्रशासनातील तहसीलदारांनी रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन दिले आणि हे टोकाचे पाऊल उचलु नका असा सल्ला दिला.
मात्र शेतकऱ्यांनी केलेला आक्रोश उपस्थितांना हेलावून टाकणारा होता.तर या घटनांनी महसूल प्रशासनावरील जनतेचा रोष आणि तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष अधोरेखित झाले आहे.



