राजकिय

पुसद पंचायत समितीमध्ये सेवा संकल्प अभियानांतर्गत लाखो रुग्णांना जीवदान देणारा रक्तदानाचा माहयज्ञ; या रक्तदान शिबीरात ९६ अधिकारी-कर्मचाऱ्यानी केले रक्तदान तर१८जणांनी केला अवयवदानाचा संकल्प!

पुसद: राष्ट्रीय ऐच्छीक रक्तदान दिनानिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील रक्त संकलन केंद्राच्या चंमुने व पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल कुमार आंदेलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सरकुंडे यांच्या नेतृत्वात पंचायत समितीच्या दालनात आज लाखो रुग्णांना जीवदान देणारा रक्तदानाचा भव्य माहयज्ञ आयोजित केला होता.

या भव्य रक्तदान शिबिर व अवयवदान शिबिरास पंचायत समितीच्या सर्वच विभागांच्या कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.या भव्य रक्तदान शिबिरात एकूण ९६ अधिकारी- कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.तर१८अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अवयवदान करण्याचा संकल्प केला असून १४८कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला या रक्तदान शिबिरासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथील रक्तकेंद्र विभागाच्या चंमुमध्ये रक्त केंद्र विभागाचे डॉ. दुधे, डॉ. अंकज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल जाधव, हर्षल शिंदे, श्रुती लोहकरे, गार्गी तरवडकर, गौरव शिंदे व जय बिस्मिरे यांनी रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली.

यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान हे गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरते, त्यामुळे प्रत्येकाने स्वेच्छेने रक्तदान, अवयव दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. अवयवदानाचा संकल्प १८ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केला असता रक्तदानासोबतच अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी अमोलकुमार आंदेलवाड गटविकास अधिकारी भगवान भगवान श्रीकृष्ण भोरकडे, ऋषिकेश रामसिंग जाट, ज्ञानेश्वर भगवान बगाडे, रवी विठ्ठलराव चौरे, दत्ता भगवान दुमारे, पुनम उबाळे, मुधोळकर व जयानंद उबाळे इ यांनी अवयवदानाचा संकल्पपत्र भरून देत सामाजिक बांधिलकी जपली.

यावेळी गटविकास अधिकारी यांनी रक्तदानाचे महत्त्व तसेच अवयवदानाचे सामाजिक व मानवी महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. तसेच डॉ. सरकुंडे साहेब यांनी अवयवदानाच्या संकल्पाबाबत सविस्तर माहिती देत नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

शिक्षण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्याचा यावेळी उत्स्फूर्त सहभाग होता या उपक्रमात पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले. सामाजिक बांधिलकी जपत पंचायत समितीतील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षकांनी रक्तदान करून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला.या रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी विशेष प्रयत्न सदर रक्तदान व अवयवदान जनजागृती उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती पी. एस. अजतधरे, बबीता देवसिंग पवार, सारिका सिरसागर, रीना धावसे, पी. एम. मुधोळकर, सुजाता मंदाडे, डॉ. सागर, प्रमोद भगत तसेच विस्तार अधिकारी जय राठोड यांनी विशेष प्रयत्न केले.

रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्यास हातभार लागतो, तर अवयवदानाचा संकल्प हा मृत्यूनंतरही अनेकांचे जीवन वाचविण्याची मानवतेची भावना जपणारा आहे. त्यामुळे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि जनजागृतीचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमाचे नोडल अधिकारी अमित बोजेवार यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close