राजकिय

पुसद नगर परिषदेचा ‘फक्त’ गोरगरिबांवर हातोडा; धनदांडग्यांचे वर्षानुवर्षे असलेल्या अतिक्रमणांना मात्र अभय!

नाईक कुटुंबाचे अतिक्रमण तातडीने हटवा, अन्यथा तीव्र जन आंदोलन छेडणार; ‘काँग्रेस’चा पुसद नगर परिषदेला इशारा!

पुसद : नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील गोरगरीब आणि छोट्या व्यावसायिकांवर कारवाई करताना तत्परता दाखवणारे न.प. प्रशासनाच्या अतिक्रमण मोहिमेतील अधिकारी कर्मचारी एरवी मात्र प्रभावशाली व धनदांडग्यांच्या अतिक्रमणांबाबत कारवाई करण्यास मात्र टाळाटाळ व दिरंगाई करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. प्रभावशाली व्यक्ती आणि बड्या नेत्यांच्या अतिक्रमण धारकांना न.प. प्रशासनाकडून पाठीशी घातले जात असून सुमारे अडीच महिने उलटूनही संबंधित अतिक्रमणा बाबत नगरपरिषदेने कोणतीही कारवाई केली नाही यासंदर्भात न.प.चे विरोधी पक्ष नेते तथा स्थानिक काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. मोहम्मद नदिम यांनी दिलेल्या तक्रारीवर बड्या नेत्यांच्या जागांवर अजुनपर्यंत कारवाई करण्यास संबंधित प्रशासनाला अपयश आल्याने नगर परिषद प्रशासनाच्या अतिक्रमण मोहिमेविरुध्द जनमानसात रोष दिसून येत आहे.पुसद नगर प्रशासन ‘फक्त’ ज्यांचे हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांवर हातोडा पडला जात आहे आणि धनदांडग्यांचे वर्षानुवर्षे असलेल्या अतिक्रमनाना मात्र अभय देत आहेत कां.?असा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.

याबाबत ‘झेप न्यूज’ला  स्थानिक काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुसद नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील मौजे पुसद खंड-१ जुना सर्हे नंबर १३२ मधील मंजूर ले-आऊट गांधी नगर ले- आऊट’ कारला रोडच्या बाजूला सार्वजनिक रस्ता व गार्डनच्या जागेवर प्रस्थापित नाईक कुटुंबीयांकडून अतिक्रमण करण्यात आले असून उपलब्ध कागदपत्रानुसार सदर ले-आऊट जुना सर्व्हे नं १३२ मध्ये आहे व सन १९६८-६९ साली या ले-आऊट ला मान्यता मिळाली होती सदर ले-आऊट मध्ये शासनाच्या नियमानुसार रस्ते व (ओपन पेज) खुली जागा सोडण्यात आलेले आहे. परंतु सदर ले-आऊट मध्ये नाईक कुटुंबयांचा बंगला असुन नाईक कुटुंबीय याच ठिकाणी वास्तव्यास आहे. परंतु उपलब्ध मंजुर नकाशाची पाहणी केली आसता बंगल्या लगत मागच्या बाजुला असलेला रस्ता आणि सरकारी खुली जागेवरही नाईक कुटुंबीयांनी अतीक्रमाण करुन पक्के बांधकाम करून ही सार्वजनिक जागा ताब्यात घेतले असल्याचे दिसुन आल्याने सदर सर्व मालमत्ता हे मंजुर ले-आऊट मधील खुली जागा आणि सार्वजनिक रस्त्याची जागा असुन हि सार्वजनिक जागा पुसद नगर परिषदेची मालकीची जागा असल्याने संबंधित नगर परिषदेकडे काँग्रेसचे गटनेते डॉ. मोहम्मद नदीम यांनी दि.५ में२०२६ रोजी तक्रार दाखल केली होती परंतु सदर तक्रारीवर अंदाजे अडीच महीने उलटले तरीही संबंधित प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे आज स्थानिक काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने नगर परिषदेचे मुख्य अधिकारी किरण सुकलवाड यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनातून संबंधित सार्वजनिक जागेवरील अतिक्रम तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे अन्यथा जन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. परंतु नाईक घराण्याच्या हातात नगर परिषदेची सत्ता असल्यामुळे हे अतिक्रमण हाटविले जाते की नाही? याकडे पुसद परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.पण पुसद नगर प्रशासन मात्र ‘फक्त’ ज्यांचे हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांवर हातोडा पडते परंतु धनदांडग्यांचे वर्षानुवर्षे असलेल्या अतिक्रमनाना मात्र अभय देत असल्याने नप प्रशासनाची भूमिका एकाला अंगाशी आणि दुसऱ्याला शिंगाशी अशी भूमिका घेतली जात आहे.या निवेदनावर ॲड. सचिन नाईक जिल्हाध्यक्ष, काँग्रेस यवतमाळ, डॉ. मोहम्मद नदीम महासचिव प्रदेश काँग्रेस, ज्ञानदीप कांबळे पुसद तालुका अध्यक्ष,झिया एच. शेख पुसद शहर अध्यक्ष, सय्यद इश्तियाक महासचिव प्रदेश अल्प, काँग्रेस, अनिल शिंदे उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस,ॲड. गजानन देशमुख सचिव जिल्हा काँग्रेस, सुजित मानकामे (सचिव जिल्हा युवा काँग्रेस,योगिता प्रकाश नेमायते महिला शहर अध्यक्ष, अभिलाश खेरमोळे अध्यक्ष युवक विधानसभा,डॉ. मोहसीन (अध्यक्ष युवक काँग्रेस, ॲड. प्रमाकर व्हीषणे अध्यक्ष एस.सी.सेल,ॲड. वसीम अहेमद नगरसेवक न.प.पुसद,शेख जब्बार लाखे नगरसेवक न.प. पुसद,शेख सुल्तान कुरेशी नगरसेवक न.प. पुसद, समिना फिरोज खान नगरसेविका न.प.पुसद,अमरीन गाज़ी खान नगरसेविका न.प. पुसद,अब्दुल वहाब लतीफ जिल्हा सचिव अल्प.काँग्रेस, ॲड.रामदास भंडगे, आदि पदाधिकारी कार्यकर्त्याच्या स्वाक्षरी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close