शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी लिलावाची प्रक्रिया वेळेत सुरू करावी- मनीष जाधव शेतकरी नेते!

पुसद : कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमी विविध कारणास्तववादाच्या भोवऱ्यात असते नुकतेच बाजार समितीमध्ये झालेल्या काटामारी प्रकरणानंतर राज्यभर हे प्रकरण गाजले निष्पक्ष चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावी या मागणीसाठी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात शेतकरी नेते मनीष जाधव यांच्या नेतृत्वात अनेक शेतकऱ्यांनी फिर्याद दाखल केली होती त्यावेळी पुसदचे उपविभागीय अधिकारी आशिष बीजवल यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची बैठक झाली कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध मुद्द्यावरून निर्माण झालेल्या भौतिक सुविधा समस्येच्या बाबत एकूण २२ मुद्द्याच्या समस्ये संदर्भात सामूहिक निवेदन शेतकऱ्यांकडून देण्यात आले होते. त्याबाबतचा चौकशी अहवाल अजूनही शेतकऱ्यांना प्राप्त झाला नाही सदर प्रकरणाच्या अनुषंगाने याबाबत पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन कडून तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ससाने साहेबांकडून वजन माप अधिकारी व पिडीत शेतकऱ्यांचे बयान घेण्यात आले आहे , समोरचा तपास चालू आहे या सर्व घडामोडीनंतर काल घाटोडी येथील मार्केट कमिटीच्या यार्डला शेतकरी नेते मनीष जाधव यांनी कार्यकर्त्यांसह भेट दिली असता शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारीनंतर खडबडून जागी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय यंत्रणेने शेतमालाचे वजन माप करणाऱ्या काट्याची तपासणी करून बाह्य भागावर दर्शनी डिजिटल स्क्रीन , सीसीटीव्ही कॅमेरे , शेतमाल नोंदीसाठी नवीन बोर्ड फलक लावले, नवीन रंगरंगोटी, व संपूर्ण काटा कार्यालय अद्यावत झाला असून शेतमाल पावसात भिजू नये म्हणून नवीन शेड बांधणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या व वजन काट्या बाबतच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मार्केट कमिटी प्रशासन व संचालक मंडळांनी खबरदारी घ्यावी, असे यावेळी शेतकऱ्याच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.
परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीने थोड्या काही सुविधा शेतकऱ्यांना पुरविल्या या शेतकरी एकजुटीचा आणि सर्व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा विजय आहे. याबाबत शेतकरी नेते मनीष जाधव यांनी सुधारणा बाबत समाधान व्यक्त केले असून स्थानिक नेत्यांना मात्र त्यावेळी दुपारचे एक वाजले असताना देखील शेतमाल लिलाव प्रक्रिया सुरू , न झाल्याने व्यापाऱ्यांच्या या कार्यपद्धतीवर शेतकरी नेते मनीष जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत व्यापाऱ्यांनी शेतमाल लिलाव प्रक्रिया लवकर चालू करून कामधंद्याच्या दिवसात शेतकऱ्यांना ताटकाळत ठेवू नका त्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मापारी सह भीमराव राठोड कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय अधिकारी व्यापारी सह विकास राठोड काटखेडा सुनील जाधव हिवळणी प्रेमराव सरगर तालुकाध्यक्ष पुसद स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.



