प्रिय राज्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त पुसद पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गटशिक्षण अधिकाऱ्यासह शिक्षक लागले कामाला विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात!
तारे जमीन पर' कार्यक्रम आयोजित करून लाडक्या नेत्याचा अनोखा वाढदिवस होणार साजरा!

पुसद : शहरात हल्ली नेत्यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या आडून स्वत:चे मार्केटिंग करण्यावर बहुतांश मंडळी भर देतात. परमार्थातून स्वार्थ साधण्यासाठी लाखो रुपये खर्ची घालण्याची त्यांची केविलवाणी धडपड मोठमोठ्या होर्डींग्ज’बॅनर ‘फ्लेक्स’ वरून दिसून येते. ज्या नेत्याचा वाढदिवस, त्या नेत्याचे महिमामंडन करतानाच स्वत:चाही उदोउदो अशा मंडळीकडून करवून घेतला जातो. मात्र, ज्यांचा राजकारणाशी कवडीचा संबंध नाही अन् ज्यांना राज्यमंत्र्यांनी बघितलेही नाही, अशा सुमारे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आणि नगरपरिषदेच्या जवळपास २१ शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीसाठी ‘तारे जमीन पर’ एक आदर्श संकल्पना करून राज्याचे सहा विभागाच्या खात्याचे राज्यमंत्री ॲड.इंद्रनील नाईक यांच्या वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी पुसद पंचायत समितीतील शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकाऱ्यांसह विस्तार अधिकारी, शिक्षकांनी मागील काही दिवसापासून संपूर्ण फलटण वाढदिवसाचे औचित्य साधून कामाला लावली आहे. आधी तालुक्यात जिल्हा परिषद शाळांची अवस्था अत्यंत बिकट असून, जीर्ण इमारती, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेचा अभाव, अपुरे शिक्षक आणि कमी पटसंख्या यांसारख्या समस्यांनी या शाळा ग्रासल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आधीच मुख्यालयी न राहता आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी शहरात वास्तव्याला आहेत तर काही जिल्हा परिषद शिक्षक आपल्या जागी सुशिक्षित तरुणांना तूटपुजे पैसे मोजून विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी लावतात आणि आपण मात्र ऐशोआरामाचे जीवन जगत आहेत तर काही शिक्षक वेळेवर शाळेत जात नसल्यामुळे शिक्षणावर मोठा परिणाम पडला आहे.अनेक ठिकाणी एकाच शिक्षकावर अनेक वर्ग चालवण्याची जबाबदारी आहे. भौतिक सुविधांची कमतरता आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा खालावत आहे. त्यातच हा वाढदिवसानिमित्त ‘तारे जमीन पर’ कार्यक्रमाची मिसाल ठरू पाहणारा हा प्रेरणादायी सोहळा पुसद शिक्षण विभागाच्या पुढाकाराने ता.२८ जानेवारी २०२६रोजी पुसद येथील सुधाकर नाईक सभागृहात साजरा करण्यात येणार आहे. मात्र आज घडीला या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून नेत्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाच्या तयारीला लागली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या जल्लोषात आयोगाच्या वतीने करण्यात येणार आहे. कारण हा कार्यक्रम राजकीय प्रेरित असून या कार्यक्रमाला विकासाचे कामे करणाऱ्या महान कंत्रादलाचा सुद्धा हातभार लागणार आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत जरी शिक्षणाचे धडे गिरवले नाही तरी मतदार संघातल्या या शाळांमध्ये राजकीय संस्काराचे धडे गिरवावे लागेल यापूर्वी सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचाही वाढदिवस या मतदारसंघातील शाळांमध्ये राजकीय पुढार्याने जाऊन साजरा केला होता. हे मात्र मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांनी विसरता कामा नये.आज आपल्या लाडक्या नेत्यांचा वाढदिवस असल्याने अनेकांनी शहरात होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्स, तसेच वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन अभिष्टचिंतन केले आहे. काहींनी फळ वाटप, मिठाई वाटप आणि वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले. मात्र, या कार्यक्रमानिमित्त आयोजकांनी आव्हान केले की, नेत्याच्या वाढदिवसा निमित्त बुके, श्रीफळ, शाल, भेटवस्तू आधी न देता गजू विद्यार्थ्यांसाठी पेन पेन्सिल नोटबुक द्या.. परंतु हेच आयोजक आपल्या नेत्याला सांगत नाहीत की,शिक्षण व आरोग्य यावर सर्वाधिक भर द्या किंवा शिक्षणासाठी निधी द्या.. त्यामुळे शिक्षण विभागातील ज्याच्या खांद्यावर शिक्षणाची जबाबदारी आहे तेच गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी शिक्षक, नेत्यांचे वाढदिवस साजरे करत असेल तर तालुक्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा कारभार ढसाळणार हे मात्र सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.



