विद्यार्थीनींनी उच्च शिक्षण घेऊन कर्तुत्व सिद्ध करावे माजी नगराध्यक्ष डॉ. माधवी गुल्हाने : नाईक महिला महाविद्यालयात सहावा दीक्षांत समारंभ

पुसद:विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवी मिळविणे हा महाविद्यालयीन जीवनातील अविस्मरणीय क्षण असतो. मात्र, एवढ्यावरच न थांबता उच्च शिक्षणाच्या बळावर विविध क्षेत्रातील आभाळ कवेत घेतले पाहिजे. प्राप्त झालेल्या संधीचे सोने करावे . विद्यार्थीनींनी उच्च शिक्षण घेऊन आपले कर्तृत्व सिद्ध करावे, असे विचार माजी नगराध्यक्ष व जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाच्या प्राचार्य डॉ.माधवी गुल्हाने यांनी व्यक्त केले.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पदवीदान सोहळा श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयात पार पडला. पुसदच्या माजी नगराध्यक्ष, जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाच्या प्राचार्य डॉ . माधवी गुल्हाने यांच्या हस्ते विद्यार्थिनींना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. विद्यार्थिनी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्य रजनी भोयर होत्या. विद्यार्थिनी मंडळाच्या समन्वयक प्रा. डॉ.स्वप्ना देशमुख मंचावर उपस्थित होत्या.सुरुवातीला कर्मयोगी संत गाडगेबाबा व श्रीमती वत्सलाबाई नाईक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीप प्रज्ज्वलित करून पदवीदान सोहळ्याचे उद्घाटन डॉ.माधवी गुल्हाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.माधवी गुल्हाने म्हणाल्या की, पदवीदान समारंभ म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण असतो. हा असा क्षण असतो जो मनुष्य आयुष्यभर स्मरणात ठेवतो, आणि या घटनेची मला साक्षीदार होत आले. माझ्या हस्ते आपल्याला पदवी प्रदान करण्यात आली, हा देखील माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. पदवी घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी अनेक मार्ग मोकळे आहेत. करिअर साठी हार्ड स्किल सोबत सॉफ्ट स्किल महत्वाचे ठरतात. ते सर्व महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमातून आत्मसात करता येतात. विद्यार्थिनींनी उच्च शिक्षणाच्या माध्यमातून या राष्ट्र , समाज व महाविद्यालयाचा नावलौकिक करावा.कार्यकारी प्राचार्य डॉ . रजनी भोयर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना म्हणाल्यात, महाविद्यालयीन जीवनातील शेवटचा व सर्वोत्तम क्षण म्हणजे पदवीदान समारंभ होय. महाविद्यालयामध्ये हा सहावा दीक्षांत समारंभ होत आहे. विद्यार्थिनींना आपण आपल्या आयुष्यामध्ये उत्तुंग भरारी घ्या, नावलौकिक मिळवा, स्वाभिमानी जगा सकारात्मक भावना ठेवा व आशावादी रहा असे मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृत विभाग प्रमुख प्रा. डॉ.वैशाली पांडे यांनी केले .याप्रसंगी विद्यापीठ गीत प्रा. आकाश ताविडे यांनी सादर केले. प्रा. डॉ. माधवी गुल्हाने यांचा परिचय विद्यार्थिनी मंडळाच्या समन्वयक प्रा. डॉ.स्वप्ना देशमुख यांनी केले . प्रा .वर्षा गारूळे यांनी आभार मानले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्य यांनी विद्यार्थिनींना प्रतिज्ञा दिली आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशासाठी विद्यार्थिनी मंडळाच्या समन्वयक प्रा. डॉ.स्वप्ना देशमुख, प्रा.विक्रांत मेश्राम,प्रा. डॉ. अमित सूरजुशे,प्रा. वर्षा गारूळे,प्रा. आशालता बरडे,प्रा. पल्लवी राठोड यांनी पुढाकार घेतला.



