क्राइम

दारव्हा शहरात भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या साह आरोपींना शेंबाळपिंपरी येथे पोलीसांनी केले जेरबंद;खंडाळा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी!

पुसद:भरदिवसा दारव्हा शहरातील एका व्यावसायिकाच्या घरी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला त्यामुळे एकच खळबळ उडाली होती परंतु दरोडा टाकून आरोपी एका आलीशान वाहनाने पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता अपर पोलिस अधीक्षक जगताप यांनी तात्काळ नाकबंदी करण्याचे आदेश दिले असता त्यानुसार पोलिसांनी शेंबाळपिंपरी येथे खंडाळा पोलिसांनी नाकाबंदी करीत सापळा रचला असताना त्यावेळी एमएच-२४/वीएल-६२४ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनामध्ये दरोडेखोर जात असताना या आरोपींना पोलिसांची चाहूल लागली असता यावेळी दरोडेखोरांनी शेंबाळपिंपरी बसस्थानकावरून वाहन वेगाने पळविले, त्यानंतर एक शेतातील आडरस्त्याने वाहन टाकले. परंतु पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत सहाही दरोडेखारांना जेरबंद करण्यात यश आले.दिवसा ढवळ्या सशस्त्र दरोडा पडल्याची ही बातमी संपूर्ण जिल्हात वाऱ्यासारखी पसरली होती परंतु आरोपी जेरबंद केल्याने सर्वसामान्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, दारव्हा शहरातील बारीपुरा परिसरात काही दरोडेखोर एका अलिशान चारचाकी वाहनाने येवून गणेश बाळबांडे या किराणा व्यावसायिकांचे घर गाठले. भरदिवसा घरात शिरून त्या घरातील महिलेवर बंदूक रोखली, तर दुसऱ्या महिलेच्या गळयावर धारधार चाकू ठेवत दरोडा टाकला. त्यानंतर घरातील रोख, सोने व चांदी असा लाखो रुपयांचा ऐवज लुटला त्यावेळी घरातील सदस्यांचे हातपाय, डोळ्यावर पट्टी बांधून दरोडेखोर पसार झाले. ही खळबळजनक घटना मंगळवारी दि.२५मार्च २०२५ भरदिवसा दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारा खळबळजनक घटना उघडकीस आली.आरोपी एका आलीशान वाहनाने पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता अपर पोलिस अधीक्षक जगताप यांनी तात्काळ नाकबंदी करण्याचे आदेश दिले असता त्यानुसार पोलिसांनी शेंबाळपिंपरी येथे खंडाळा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून शेंबाळपिंपरी परिसरात दरोडेखोरांना जेरबंद केले. गणेश काळबांडे, रा. राममंदिर जवळ बारीपुरा दारव्हा असे किराणा व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांचे शहरातील अतिशय जुने किराणा प्रतिष्ठान आहे. यावेळी दरोडेखोरांनी घरातून ४ लाख रुपये रोख, २५ तोळे सोने, दोन किलो चांदी, असा ३० ते ३५ लाखांचा मुद्देमाल लुटून वाहनाने पोबारा केला.त्यावेळी काळबांडे हे दुकानातून घरी जेवण करण्यासाठी परत आल्यावर हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या घटनेची बातमी परिसरात पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच दारव्हा पोलिसांना मिळाली असता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून अपर पोलीस अधीक्षक जगताप यांच्या आदेशानुसार अरोपींचे शोध कार्य सुरु करण्याचे आदेश दिले असता यादरम्यान त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी केली.तेंव्हा नाकाबंदी करून सापळा रचला असता शेंबाळपिंपरी येथे खंडाळा पोलिसांनी या घटनेतील दरोडेखोर अश्रफ परवेज खान, रा. नांदेड, महेश रामप्रसाद पिंपरने, आदर्श देवीसिंग बीडला, रा. नांदेड, कार्तिक रमेश गुलकशा, गणेश श्याम कुडुरवार या सर्व आरोपींना खंडाळा पोलिसांनी रंगेहात जेरबंद केले.त्यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी व अन्य पोलिस पथकांनी घटनास्थळी घटनास्थळ गाठले कापडी बॅगमध्ये आढळल्या दोन पिस्तूलः यावेळी दरोडेखोरांच्या वाहनामध्ये असलेल्या दोन कापडी बॅगमध्ये २ पिस्तूल आणि शत्रसाठा आढळून आला. शस्त्रसाठ्यासह एकूण ५० लाखांचा मुद्देमाल जप्त करून दरोडेखोरांना जेरबंद केले ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बी.जे. यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास पाटील, सहपोलिस निरीक्षक देवानंद कायंदे, गोविंद खटारे, सुरेश राठोड, सुनील हगवणे, पांडे, देवानंद वाहूळे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close