शैक्षणिक

श्री देव हायस्कूल कारला येथे राष्ट्रपिता म. गांधी व स्व.लाल बहादूर शास्त्री यांची जयंती संपन्न!

पुसद : तालुक्यातील श्री देव हायस्कूल कारला येथे २ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रपिता म. गांधी तसेच स्व.पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती संपन्न झाली. सर्वप्रथम सद्गुरु ओंकारनाथ देवांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक संजय चेके व ज्येष्ठ शिक्षक गणाजी इंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक संजय चेके व ज्येष्ठ शिक्षक गणाजी इंगळे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यारपण करण्यात आले सर्व मान्यवरांचे विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेतील परसबागेतील पुष्पाद्वारे निर्मित पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.वर्ग पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी बापू व शास्त्रीजी यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत असताना भाषणे नाटिका गीत गायन सादर केले. ज्येष्ठ शिक्षक इंगळे सर यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या शिस्त प्रिय वक्तशीरपणा हा गुण प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असायला हवा असे प्रतिपादन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक संजय चेके यांनी महात्मा गांधी यांचे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये अतिशय मानाचे स्थान असून त्यांनी सत्य अहिंसा यासाठीचे कार्य केलेले आहे त्याला जगात कुठेही तोड नाही असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी या वेळेला जय जवान जय किसान या घोषणेने संपूर्ण शाळेचा परिसर दुमदुमून सोडला.याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक नरेशकुमार मराठे सच्चिदानंद दुधे मुकुंद जोशी अमोल गवळी जनार्दन मांजरे गजानन डाखोरे किरण कैलासवार राजू काळे तर शिक्षकेतर कर्मचारी जयवंतराव सूर्य व किरण साखरे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वर्ग सहावीची विद्यार्थिनी कु.सायली बाळू राठोड तर कार्यक्रमाचे संचलन कु. वेदिका देवानंद मंदाडे हिने केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close