जिल्हा न्यायालयात गुवावंत विदयार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन

यवतमाळ: येथील जिल्हा न्यायालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा जिल्हा न्यायालयात कार्यरत कमचा-यांच्या सर्व संघटनांनी मिळुन आयोजीत केला होता. विदयार्थ्यांच्या कला गुनांना वाव देण्यासाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठी सदर सोहळयाचे आयोजन गेली अनेक वर्षे करण्यात येत असून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सर्व संत्र घटनांनी मिळून मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ना. वि. नहावकर साहेब यांचे अध्यक्षतेखाली व मा. जिल्हा न्यायाधीश -१ श्री. व्हि बी. कुलकर्णी साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत या सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात १० वी, १२वी, व विशेष प्राविण्य प्राप्त ४० न्यायालयीन कर्मचारी यांच्या मुलांचा सत्कार यावेळी करण्यात आला असून सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायालयाचे मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ना. वि. न्हावकर साहेब हे विराजमान होते तर विशेष उपस्थिती म्हणुन मा. जिल्हा न्यायाधीश-१ श्री. व्हि. वी. कुळकर्णी साहेब यांनी हजेरी लावली. तसेच जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक श्री. संजय प्र. बखाल व जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रविण भा. राउत है व्यासपीठावर उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ना. वि. न्हावकर साहेबांनी विदयार्थ्यांचे कौतुक करतानाच त्यांनी भावी जिवनात समाजसुधारणेचे कार्य करावे देशाच्या जडण घडणीत हातभार लावावा असे आव्हान विदयाध्यांना केले, तसेच न्यायालयीन कर्मचारी यांचे आर्थीक सुबत्ते करीता जिल्हा न्यायालयीन कर्मचारी यांची पतसंस्था सुरू करण्याकरीता प्रयत्न करावे असे देखील त्यांनी सुचित केले.सदर कार्यक्रमात प्रमुख वक्ते व विशेष उपस्थिती असलेले श्री. व्हि. बी. कुळकर्णी साहेबानी आपल्या भाषणाची सुरुवात ” सहणाभवतु सहनीभुनक्तु सहर्वियम कर्वावहे” या श्लोकाने केली शिक्षण हे माणसाचे जिवनण बदलवीत असताते ते आपली गरीबी दुर करते, बेरोजगारी दुर करते, शिक्षण हे सर्वांगीन असले पाहिजे असे आवर्जुन सांगताना त्यांनी मा गांधी व स्वामी विवेकानंद यांनी शिक्षण कसे असावे व शिक्षणपद्धती म्हणजे काय हे विस्ताराने सांगितलेले आहे. त्यांचे त्यावेळेचे मार्गदर्शन आजही सर्व विदयार्थ्यांना प्रेरीत करते, महात्माजी शिक्षण म्हणजे विदयार्थचा मानसीक, अध्यात्मीक शारीरीक व शैक्षणीक विकास असे म्हणायचे मानुस हा शिक्षणाने शिक्षीत होवु शकतो परंतु सुस्कारीत होण्यासाठरी त्याला स्वत हुन प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही त्यांनी प्रतीपादन केले विद्याध्यर्थाने शिक्षा घेताना सातत्याने सावध असले पाहिजे ज्यापमाणे कावळा कुठेही असताना चारही बाजुला आपले लक्ष ठेवून असतो कधी वर पाहता कधी उजवीकडे पाहतो कधी डावी कडे पाहतो तो त्यांच्या जिवनमामध्ये सतर्क असतो तसे विदयार्थ्यांनी त्या पक्षाकडुन बोध घेऊन स्वतःला सतर्क ठेवणे काळाची गरज आहे, तसेच गाडी चालवताना डायव्हरला जसे सावधान राहावे लागते तशी सावधानी हटी दुर्घटना घटी ही म्हण उद्धृत केली. विदयार्थानी आपल्या भावनांना, मनाला, दृष्टीला व वाणीला सांभाळुन चालणे गरजेचे आहे. जिवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला ध्येय व स्वप्ने असणे गरजेचे आहे परंत ते स्वप्न पुरे न झालयास नाराज न होता आपण माँ भारतीचे सेवक आहो असे समजुन आपली विदया आपली शक्ती ही देश कार्यासाठी समपर्तीत करणे ही काळाची गरज आहे.त्यांनी पुन्हा साक्षरता म्हणजे शिक्षण नसुन शिक्षण हे सुसंस्कार व सुसंस्कृत होणे हे आहे असे प्रतिपादन केले व भारत मातेचा जयजयकार करून आपल्या भाषणाची सांगता केली. विदयार्थ्यांना निती व मुल्ये आणि संस्काराची जाणीव करून देत असतानाच शिक्षण घेतलेला माणूस हा केवळ असार ज्ञानाने परिपुर्ण होत नसुन तो त्यांच्या संस्काराने मोठा होत असतो व त्याचा समाजाला खुप मोठया प्रमाणात उपयोग होतो ही वाव प्रामुख्याने अधोरेखीत केली. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे सचिव श्री.प्रविण मो. राउत यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रासताविक श्री. प्रफुल ठाकरे यांनी तसेच आभार प्रदर्शनाची जबाबदारी श्री नाजीम शेख यांनी पार पाडली तर विदयार्थी सत्कार सोहळ याची पुरस्कार वितरणाची जबाबदारी सौ दरणे मॅडम, सौ. बुराडे मॅडम, सौ. खापरकर मॅडम यांनी पार पाडली. तसेच सदर कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी सर्व न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या पदाधीकारी व सदस्य व कर्मचारी यांनी कार्य केले. श्री. विनोद चव्हाण महासंघ प्रतिनिधी १२व सौ. वदंना आढाव यांचे मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली व त्यासाठी श्री. गजानन अंबाडकर, श्री. विश्वास चेडे, श्री अमोल बेंद्रे, श्री. अमोल ठाकरे, श्री. एकनाथ बाहेकर श्री प्रविण पाटील, श्री. राजेश भामकर, श्री. आशिष रोठकर, श्री. पंकज खडसे, श्री कपील पोले, श्री. कैलाश शेवे, श्री. रवि बुटले, श्री. गंपावार, श्री. संदीप कल्याणकर, श्री. गणेश पाटील, श्री. सीरसार, श्री. शंकर चव्हाण श्री गणेश भोयर, श्री. राजु सोनटक्के, श्री. महानंद लोहोटे, श्री. मो. शफीक, श्री, संजय चौधरी सौ.दरणे मॅडम, सौ. बुराडे मॅडम, सौ. खापरकर मॅडम, सौ. लिखार मॅडम सौ. सेंगर मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले.



