क्राइम

मुखरे बोरी शेत शिवारातील शेतकऱ्याच्या बांधावरील चार चंदनाच्या झाडावर चोरट्यांचा डल्ला!

पुसद: शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मुखरे बोरी शेत शिवारातील बांधावरील चार चंदनाच्या झाडाची अज्ञात चोरट्याने डल्ला मारला आहे. ही घटना (ता.२५) जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.  पुसद येथील शेतकरी राजेश सरदारसिंग मालाणी रा. वसंत नगर ( मालाणी हॉस्पिटल)या शेतकऱ्याने शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून शेतकऱ्याच्या बांधावरील तब्बल ४ चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी तोडून त्यापैकी तीन झाडे नेली आहेत. यात सदरील शेतकऱ्याचे जवळपास २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशन येथे शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. एकीकडे शासन चंदन लागवडीसाठी प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे मात्र चंदनाच्या झाडांची चोरी करणार्‍या या चोरट्यांच्या मुसक्या आवळने गरजेचे आहे.त्यामुळे वनविभागाने व पोलीस प्रशासनाने परिसरात अशा घटना पुन्हा घडणार नाही याची खबरदारी घेऊन चंदनचोरट्याच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close