सामाजिक

पाऊले चालती पंढरीची वाट…. श्री शिवाजी विद्यालय व गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या वतीने भव्य दिव्य दिंडी सोहळ्याचे डोळे दीपवणारं विहंगम दृश्य… 

श्री शिवाजी विद्यालय व गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या दिंडी सोहळ्यात चालताना वारीचा अनुभव- माजी आमदार ॲड. निलय नाईक 

पुसद  : येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद द्वारा संचालित गुरुकुल इंग्लिश स्कूल आणि श्री शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती व संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने आषाढी एकादशीनिमित्त ४ जुलै २०२५ रोजी पाऊले चालती पंढरीची वाट भव्य दिव्य दिंडी सोहळ्याचे

आयोजन श्री शिवाजी विद्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे संत ज्ञानेश्वर संस्थान पर्यंत करण्यात आले.सर्वप्रथम माजी आमदार ॲड.निलय भाऊ नाईक व ॲड.सुजाताताई निलय नाईक यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले, त्यांच्या समवेत विजयराव जाधव ,डॉ. अमोल मालपाणी, निळकंठ पाटील, महेश भाऊ खडसे,श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर, सचिव अश्विनीताई अनिरुद्ध पाटील चोंढीकर ,अभय राठोड, सुधाकर ठाकरे, आशिष देशमुख ,ज्ञानेश्वर संस्थांचे पदाधिकारी डॉ. राजेंद्र गादेवार, विजय केशट्टीवार उपस्थित होते. याप्रसंगी सर्व मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. संजय भांगडे ,नंदू चौधरी प्रतीक पाटील मनीष ठाकरे निरंजन आसोले नितीन पाटील , प्रवेश टाकरस इत्यादी मान्यवर दिंडी समवेत उपस्थित होते.त्यानंतर पालखीचे मंदिराकडे प्रस्थान झाले.

वारकरी रचना ठरल्या पुसदकरांचे आकर्षण..

सदर दिंडी सोहळ्यात पाचशे ते सहाशे विद्यार्थी शिक्षकांसह मान्यवर वारकऱ्यांच्या पोशाखात दिंडीत प्रत्यक्ष चालत होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वारकरी रचना सादर केल्या. ह्या रचना पुसद करांच्या मुख्य आकर्षण ठरल्या. यावेळी दिंडीला पाहण्यासाठी व दर्शनासाठी पुसद करांची प्रचंड गर्दी झालेली दिसून आली. ढोल पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली. सदर दिंडी सोहळ्याचे वृत्त निवेदन कु. गौरी खरे व शर्वरी वडपल्लेवार यांनी केले. त्यानंतर सुभाष चंद्र बोस चौक मार्गे कापड लाईन, गुजरी चौक मधून दिंडी ज्ञानेश्वर संस्थान येथे पोहोचली. ज्ञानेश्वर संस्थांचे अध्यक्ष बिपिन चिद्दरवार व पदाधिकारी आणि सेवेकरी यांनी मंदिरात प्रत्येक विद्यार्थ्याला दर्शन घेता येईल अशी व्यवस्था करून दिली. त्यानंतर निलय भाऊ नाईक, सुजाता ताई नाईक, अनिरुद्ध पाटील चोंढीकर, अश्विनीताई अनिरुद्ध पाटील यांनी विठ्ठलाची विधीवत आरती केली.

यावेळी ज्ञानेश्वर मंदिर संस्थानच्या वतीने मान्यवरांचे ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो देऊन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त करताना ॲड. निलय नाईक म्हणाले की आज मी सहपरिवार या दिंडीत पूर्णपणे विद्यार्थी वारकऱ्यासोबत चालत आलो.

तो दिंडीत चालताना मिळणारा आनंद मला श्री शिवाजी विद्यालयाच्या दिंडी सोहळ्याने मिळवून दिला हे मी माझे भाग्य समजतो. त्याचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव अश्विनी पाटील यांना जाईल. त्याचबरोबर संपूर्ण दिंडी अत्यंत उत्तम पद्धतीने आयोजित केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक, आयोजक सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे त्यांनी मनापासून कौतुक केले. ज्ञानेश्वर संस्थांनचे अध्यक्ष बिपिन चिद्दरवार यांनी विद्यालयाने आयोजित केलेली दिंडी संस्थांन मध्ये आणली व संस्थांनला या दिंडीची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल विद्यालयाचे आभार व्यक्त केले .त्यानंतर विद्यार्थ्यांना संस्थानच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. संस्थांनमधील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंजाबराव सुरोशे यांनी केले तर संस्थेच्या वतीने व विद्यालयाच्या वतीने प्रा. गजानन जाधव यांनी संस्थांनचे आभार व्यक्त केले .अत्यंत आनंदमय आणि उत्साह पूर्ण वातावरणात दिंडी सोहळा संपन्न झाला.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य रामचंद्र हिरवे, प्राचार्य डॉ. लक्ष्मण वानखेडे ,प्राचार्य अमित ठाकूर, उपप्राचार्य दत्तात्रय जीवने, पर्यवेक्षक प्रज्ञा गडदे, समन्वयक प्रा. विक्रम ठाकरे, संयोजक प्रा.गजानन जाधव संकल्पना सचिन नालींदे ,मंगेश जाधव ,नीता खराटे ,स्वाती पाटील, प्राची गायकवाड, सुरज चौधरी ,प्रणिता मंदाडे, शिल्पा कदम, यासह श्री शिवाजी विद्यालयातील व गुरुकुल इंग्लिश स्कूल मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close