सामाजिक

आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गुणवंतांचा गुणगौरव व मार्गदर्शन शिबिर;मराठा सेवा संघाचा पुढाकार : सारथी योजनेसंदर्भात मार्गदर्शन शिबिर

पुसद :शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मराठा सेवा संघ पुसद तर्फे मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंतांचा गुणगौरव तसेच सारथी योजनेसंदर्भात विद्यार्थी,सुशिक्षित बेकार व व्यापार्‍यांना मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून पुसद तालुक्यातील मराठा—कुणबी समाजातील इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंतांनी मिळविलेल्या देदिप्यमान यशाचे कौतुक करण्यासाठी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन मराठा सेवा संघ पुसद व्दारे मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंतराव देशमुख विद्यालयाच्या सभागृहात आज सायं.६.०० वा.करण्यात आले आहे.तसेच महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणार्‍या सारथी या योजनेअंतर्गत मराठा कुणबी समाजातील विद्यार्थी,सुशिक्षित बेकार व व्यापारी यांच्यासाठी आर्थिक,शैक्षणिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात येणार्‍याच्या विविध कल्याणकारी उपक्रम व योजनांची माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालय पुसद यांच्या तर्फे आयोजित शिबिरात देण्यात येणार आहे.आयोजित कार्यक्रमाला इ.१० वी ,१२ वीतील गुणवंत,पालक,सुशिक्षित बेकार,व्यापारी,शेतकरी व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेडसह सेवा संघाच्या सर्व कक्षांनी केले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close