सामाजिक

जगतगुरू संत श्री सेवालाल महाराज जन्मोत्सव सोहळा २०२४ची पुसद मध्ये जय्यत तयारी 

पुसद : बंजारा समाजाचे आराध्य दैवत सर्वश्रेष्ठ जगतगुरु संत श्री सेवालाल महाराज जन्मोत्सव सोहळा २०२४ गुरुवार दि . १५ फेब्रुवारी २०२४ दुपारी : ०१:०० वाजता कै.वसंतराव नाईक चौक पुसद येथून शोभायात्रा प्रारंभ करण्याचे ठरविण्यात आले आहे . हि शोभा यात्रा पुसदकरान करीता सामाजीक मुल्य जतन करत प्रोत्साहन देणारी सुनियोजीत सास्कृतीक शोभा यात्रा करण्याचा मानस घेऊन जगतगुरू संत श्री सेवालाल महाराज जन्मोत्सव सोहळा समिती २०२४ ने आयोजन केली आहे . या मध्ये बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज जयंती निमित्त पारंपारिक वेशभुषा , बैलगाडी , भजनी मंडळी , डफडे वादक यांचा समावेश करत शोभायात्रा काढण्यात येणार आहे . हि शोभायात्रा कै. वसंतराव नाईक चौक येथुन निघणार आहे व महात्मा ज्योतीबा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुधाकरराव नाईक चौक येथून मार्गक्रम करत आरदास व महाप्रसाद जगतगुरू संत श्री सेवालाल महाराज मंदिर , स्वप्न नगरी माहूररोड पुसद येथे समारोप करण्यात येणार आहे. तरी सर्व गोर बंजारा बाघव यानी पारंपारीक वेशभूषा व साधन सामग्री सह शोभायात्रेत सहभागी होण्याचे आव्हान ययाती मनोहरराव नाईक यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close