बाबा रामदेवजी जम्मा जागरण व खेल उत्सव हर्षउल्हासात संपन्न!

पुसद :अखिल भारतीय मारवाडी युवा मंच, पुसद च्या वतीने या वर्षी प्रसिद्ध जम्मा गायक श्री सुशिलजी गोपालजी बजाज यांच्या मधुर वाणीतून बाबा रामदेवजी च्या चरित्रा वर संगितमय जम्मा जागरण श्री साई मंदिर पुसद येथे संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थीत होते. जम्मा जागरण कार्यक्रमासाठी मुख्य यजमान व आरती यजमान लकी ड्रॉ द्वारे नावे घोषीत करण्यात आली. मुख्य यजमान साठी सांवरिया महाराज, संतोषजी निलेश अग्रवाल , संदिप जांगिड, डॉ. राजेश अग्रवाल,आकाश ओ. राठी ,अ.भा.मा.युवा मंच तर्फे रुपेश चंन्द्रकांत गजबी व जन्म आरती तथा समाप्ती आरती यजमान साठी गिरीश दिक्षीत, राजकुमार अग्रवाल , बालाजी इन्नाणी, कालुराम देवासी, श्रीकांत दायमा, पपाराम चौधरी, कृष्णा मेवाड, विजय अग्रवाल, अशोक भंडारी, भवरजी जांगिड, अर्चना गजबी, मदनजी जांगिड (कलवाणी), गोंविंद राठी, विठ्ठल मालपाणी, धिरज भार्गव, सुनिल इन्नाणी यांना यजमान पदाचा लाभ मिळाला. तसेच खेल उत्सव मध्ये बुद्धीबळ स्पर्धा, स्लो सायकल स्पर्धा, लगोरी व मटका फोडी स्पर्धा, रंग भरो स्पर्धा, बॉक्स क्रिकेट स्पर्धा (महीलांन साठी),आनंद मेला तसेच सांस्कृतीक कार्यक्रम, राजस्थानी महीला मंडल व माहेश्वरी महीला मंडल प्रस्तुत ‘प्रभुलीला’ कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला. सदर सर्व कार्यक्रमानंतर पुरस्कार वितरण करण्यात आले.
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अखिल भारतीय मारवाडी युवा मंच पुसद, राजस्थान मंडल व राजस्थानी महीला मंडल पुसद च्या कार्यकारणी सदस्य व समाज बांधवानी सहकार्य केले.मागिल विस वर्षापासून मारवाडी युवा मंच समाजउपयोगी कार्यक्रम घेत आलेले आहे हे विशेष.



