राजकिय

केंद्र व राज्य सरकारच्या लोकविरोधी धोरणाविरोधात किसान व भाकपचा प्रचंड मोर्चा संपन्न !

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) :म.रा.किसान सभा,संयुक्त किसान मोर्चा व भारतिय कम्युनिस्ट पक्षाचा केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात प्रागतिक आघाडिचे वणी विधानसभा उमेदवार कॉ.अनिल हेपट,भाकपचे जिल्हा सचिव काॅ.अनिल घाटे यांचे नेत्रुत्वात प्रचंड मोर्चा निघाला.मोर्चा शहरात मुख्य मार्गाने फिरून तहसील कार्यालयावर धडकला व शासनास विवीध मागण्यांचे निवेदन सादर केले.

 

१)केेद्र सरकारने खवडी कापुस खरेदी करण्याचा निर्णय मागे घेऊन संपुर्ण कापुस खरेदी करण्यात यावा.२)शेतिमालाचे भाव पाडणे बंद करावे,आयात निर्यात धोरणात अवाजवी हस्तक्षेप बंद करावा.३)किमान हमीभावाचा कायदा करावा.४)पैसा नको धान्यच द्या जुनी धान्य योजना नियमित सुरू ठेवावी. ५)अतिक्रमणधारक शेतकरयावर जबरदस्तिने शेतिवरून हुसकावून लावणे बंद करा व त्वरीत कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावे. ६)वाढती महागाई कमी करण्यात यावी. ७)कंत्राटी पध्दतिने नौकर भरती बंद करावी व कायम स्वरुपाची नौकर भरती करावी.

८) सरकारी शाळांचे खाजगीकरण बंद करा.९) सरकारी उद्योगाचे,बॅंक,दवाखाने,शेतिचे खाजगीकरण बंद करावे. १०)धार्मिक कार्यक्रमात ध्वणीनियंत्रनाची सक्ती करावी. ११)पावसाच्या अनियमितपणामुळे शेतकरयांचे शेती पिक धोक्यात असल्याने पिक विम्याचे योग्य सर्वे करून विमा क्लेम देण्यात यावा. १२) सोयाबीन पिकांवर येलो मोझाॅक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे संपुर्ण सोयाबीन पिक आताचे गेले आहे त्यामुळे सर्वे करून मदत करावी.या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.मोर्चामध्ये कॉ.बंडु गोलर,वासुदेव गोहणे,प्रविण रोगे,नितेश तुराणकर,पंढरी मोहीतकर,रामदास पखाले,चंदु पोतराजे,हरिच्छंद्र तुराणकर,अथर्व निवडिंग,डाॅ.श्रिकांत तांबेकर,लता रामटेके,पुंडलिक ढुमणे,प्रमोद पहूरकर,शंकर केमेकर,पांडुरंग ठावरी यांचेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close