क्राइम

पुसद व महागांव येथील घरफोडी तसेच मोटार सायकल चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरटयांना अटक; स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची मोठी कारवाई!

पुसद: शहरात अ गुन्हे उघडकीस आणन्याचे दृष्टीने रेकॉर्ड वरील आरोपी चेक करण्या करीता स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पेट्रोलींग करीत असतांना पथकाला गोपनीय माहिती प्राप्त झाली की, रेकॉर्डवरील गुनगारनामे प्रविण उर्फ पठः सुदाम जाधव रा. पार्वती नगर पुसद हा त्याचे साथीदारासह चोरीची हिरो सलेंडर मोटर सायकल घेवून दिग्रस रोडवरील वॉटर सप्लाय कडुन जाणार आहे अशी विश्वसनीय बातमी मिळाल्याने पथकाने अनाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठून सापळा रचला असता सदर मार्गाने माहिती प्रमाणे वर्णन असलेल्या मोटार सायकलवर दोन इसम येतांना दिसले त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता मोटर सायकल चालकाने वाहन पुढे पळविले व मोटार सायकलवर मागे चसुन असलेला इसम पळुन गेला स्टाफ चे मदतीने मोटार सायकल चालकास ताब्यात घेवुन त्याचा नांव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नांव प्रविण उर्फ पउ सुदाम जाधव वय २७ वर्ष रा. पार्वती नगर पुसद असल्याचे व पळुन गेलेला त्याचा साथीदार आकाश कांबळे रा. धनकेश्वर वार्ड पुसद हा असल्याचे सांगीतले. त्यांचे ताब्यात असलेले वाहन हिरो स्प्लेंडर क्रमांक एम.एच. एजी ८४९६ बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्ली वरुन सदर वाहनाबाबत माहिती प्राप्त केली असता सदर वाहन हे पो.स्टे. वसंतनगर हद्दीतून चोरी गेले असल्याची माहिती प्राप्त झाली. प्रविण उर्फ पड़ सुदाम जाधव यास अधिक विचारपुस केली असता त्याने मोटर सायकल चोरी बरोबरच घरफोडया सुध्दा केल्या असल्याची व त्यातून प्राप्त मुद्देमाल व मोटर सायकलो त्याचा साथीदार नामे हसन खान दौलत खान (चौधरी) वय ५० रा. अखेरतनगर पुसद यांचे जवळ ठेवला असल्याचे सांगीतल्याने हसन खान दौलत खान (चौधरी) यास ताब्यात घेवुन एकुण ०४ मोटर सायकल व ०३ एल ई डी दिल्ली व एक एच पी कंपनीचा सिलेंडर असा एकूण २,८९,०००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.आरोपी नामे १) प्रविण उर्फ पउ सुदाम जाधव वय २७ वर्ष रा. पार्वती नगर पुसद पुसद व महागाँव परिसरात घरफोडीमोटर सायकाम चोरी करणारे २) हसन खान दौलत खान (चौधरी) वय ५० रा. अखेरतनगर पुसद, व त्यांचे कडुन जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन वसंतनगर चे ताब्यात देण्यात आला आहे. सदर कारवाई ही पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, प्रदिप परदेशी पोलीस निरीक्षक स्थागुशा, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि अमोल सांगळे, पोउपनि सागर भारस्कर, पोलीस अंमलदार तेजाव रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, सोहेल मिर्झा, सुनिल पंडागळे, पंकज पातुरकर,मो. ताज, दिगांबर गिते सर्व स्वा.गु.शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close