फुलसांवगी येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ;परिसरातील ७०० रुग्णांनी घेतला लाभ!

महागाव/प्रतिनिधी(संदीप कदम):तालुक्यातील फुलसावंगी येथे दि.१५ जुन गुरुवार रोजी,सामाजिक कार्यकर्ते किशोर भवरे यांच्या वतीने व लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या विद्यमानाने भव्य रोगनिदान,मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये फुलसावंगी परिसरातील जवळपास ७०० ते ८०० रुग्णांनी सहभाग नोंदविला.तसेच या शिबिरामध्ये तपासणी झालेल्या रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नांदेड येथे नेऊन त्यांच्यावर लॉयन्स नेञ रूग्णालय येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत.असे सामाजिक कार्यकर्ते किशोर भवरे यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या छोटे खाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष .डॉ वजाहत मिर्झा आमदार विधान परिषद,प्रमुख पाहुणे सचिन नाईक, माजी आमदार विजय खडसे. तातूभाऊ देशमुख, किशोर भवरे,जानी कमर बेग, स्वप्निल नाईक, विजय महाजन,कुणाल नाईक,बाबू खान पठाण,नागोराव ढोले,यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनेकांनी सहभाग घेतला.



