राजकिय

राष्ट्रवादी काँग्रेस एसपी गटाकडून शरद मैंद यांनी हजारोंच्या उपस्थितीत नामनिर्देशन पत्र केले दाखल! 

पुसद: पुसद विधानसभा मतदारसंघासाठी नामांकन पत्र भरण्याच्या अखेरच्या दिवशी दि.२९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस एसपी गटाकडून पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी हजारोंच्या उपस्थितीत आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.पुसद अर्बन बँकेचे पाचव्या टर्ममध्ये सुमारे तेवीस वर्षापासून अध्यक्ष पद भूषविणारे आणि समाजकारणात सतत सक्रिय असणारे शरद मैंद यांनी दि.२९ रोजी दुपारी १:०० वाजता सुमारे पाच ते सात हजार महिला व पुरुष समर्थकांसह प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले.

वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयात समोरील ब्राह्मणातून त्यांनी एलआयसी कार्यालय न्यायालय परिषद ते बाबासाहेब मोरे पुतळा इथपर्यंत प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत पदयात्रा काढली. विशेष म्हणजे शरद महिन्यांना या पदयात्री दरम्यान खांद्यावर उचलून कार्यकर्त्यांनी नेले. शरद मैद यांच्या उमेदवारीने मतदार संघात व युवक वर्गात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या मतदारसंघाची सुमारे ७२ वर्षांपासून एकहाती सत्ता असलेली नाईक घराण्याची मक्तेदारी मोडीत निघणार असे चित्र सर्वत्र दिसत आहे. शरद मैंद यांचे नामांकन भरताना महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम, राष्ट्रीय काँग्रेसचे डॉ.महंमद नदीम, विजयराव चव्हाण, वसंतराव पाटील कान्हेकर, पंजाबराव खडकेकर, प्राध्यापक शिवाजी राठोड, साकला, शिलानंद कांबळे, किशोर कांबळे, पंडितराव देशमुख, नारायण शिरसागर ,दीपक जाधव, अनिल ठाकूर, नाना जळगावकर, अजय पुरोहित, मोहन विश्वकर्मा, तातू देशमुख, शिवाजी सवनेकर, परमेश्वर जयस्वाल, ॲड .भारत जाधव, संजय भोणे,रवी पांडे,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close