मूल्यवर्धन शिक्षण फार गरजेचे -संजय आसोले.

पुसद:तालुक्यातील बेलोरा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,येथे आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत घेतलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून संजय आसोले बोलत होते .ते पुढे म्हणाले की ,आपल्या घरची वडीलधारी मंडळी आई वडील, आजी आजोबा ,भाऊ-बहीण, काका काकू, मामा-मामी व इतर सर्व मोठ्या मंडळींचा मानपान ठेवा. त्यांचा नेहमी आदर करा.त्यांनी सांगितलेली कामे ऐका .त्यांना घरच्या कामात मदत करा . त्यांनी सांगितलेले प्रत्येक काम करा. त्यांना फीरून (उलटून)बोलू नका .शिव्या देऊ नका.असे वेगवेगळे उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. सर्व माहिती समजावून सांगितली.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडितराव मस्के हे होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शालिक वाघमारे हे विचारपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडितराव मस्के म्हणाले की ,आई-वडिलांचे आपणावर खूप मोठे उपकार आहेत ,आपण त्याची जाणीव ठेवून चांगले वागावे. आपले आई-वडिलांचा कुठेही अपमान होईल किंवा नाव खराब होईल असे आपण वागू नये. त्यांचे नाव मोठे होईल असेच नेहमी वागावे.असे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा . दतराव काळबांडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. योगेश आडे ,सारजा वाढोणकर, विजय वंजारे ,विठ्ठल ढाले ,भास्कर मुकाडे ,भीमराव मनवर, रमेश तडसे, गजानन नरोटे, संभाजी जाधव, शंकरराव आसोले, गणेश जाधव, विष्णू नप्ते,जीवन राठोड, वेदांत मारकड, वैभव जाधव, विठ्ठल पोले, पांडुरंग मारकड, रोहन खेडकर, साईनाथ आवळे, इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.शेवटी सर्वांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



