ईतर

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत आदर्श गृहप्रवेश व मातृऋण सोहळा संपन्न

वणी/प्रतिनिधी (शुभम कडू ) : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत वणी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक नितीन मोवाडे यांनी अभिनव पद्धतीने आपल्या नवीन घराचा गृहप्रवेश समारंभ साजरा केला.यावेळी शिवसेवक मंगेश खामनकर यांनी शिवधर्मगाथा आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाचे वाचन केले.

जिजाऊ-शिवराय आणि वडिलांच्या प्रतिमांचे पूजन करून शिवधर्मपद्धतीने हा सोहळा संपन्न झाला.यानिमित्ताने समाज प्रबोधन करण्यासाठी अमरावती येथील सुप्रसिद्ध वक्ते प्रेमकुमार बोके यांचे “आपल्या प्रथा परंपरा” याविषयावर व्याख्यान झाले.त्यांनी उपस्थित पाहुण्यांना अंधश्रद्धेच्या आहारी न जाता संत महापुरुष यांच्या विचारांचे दाखले देत विवेकाने वागण्याचे आवाहन केले. दरम्यान, मातृऋण सोहळ्यात सरांच्या आई लीलाबाई गजानन मोवाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते कृतज्ञतापूर्वक सत्कार

करण्यात आला.त्याचबरोबर घर-बांधकाम करणाऱ्या सर्व कामगारांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.भारतीय संविधानाच्या 300 प्रतींचे यावेळी वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अंबादास वागदरकर होते.आपल्या अध्यक्षीय मनोगतातून त्यांनी असे समाजोपयोगी उपक्रम करण्यासाठी मोवाडे सरांचा आदर्श घेण्याचे सूचविले. सूत्रसंचालन विशाखा चौधरी यांनी तर, आभार प्रदर्शन मीनाक्षी मोवाडे यांनी केले.सरांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close