आजची नारी क्लब चा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा!

पुसद : येथील आजची नारी क्लब पुसदच्या वतीने जवळपास दीडशे महिलांनी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला, या कार्यक्रमात महिलांनी मधील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून अनेक महिलांनी नृत्य, गायन करून दाखवले तर विविध स्पर्धा मधून महिलांना चालना देऊन त्यांच्यात काहीतरी करून दाखवण्याची उमेद जागृत करून आजच्या नारी क्लबने सकारात्मक दृष्टिकोन महिलांमध्ये यावा, दैनंदिन जीवनामध्ये सर्वांचं करता करता स्वतःला विसरलेली स्त्री ही स्वतः किती स्वतःसाठी स्पेशल आहे.
हे त्यांना जाणून देऊन एक दिवस तरी स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी जगावे, त्यासोबत सकारात्मक दृष्टिकोनातून छोटे छोटे गोष्टी सेलिब्रेट करत आनंद घेत परिवारासोबत राहताना परिवाराला सांभाळताना स्वतःलाही चांगल्या प्रकारे सांभाळण्यासाठी सोशल होऊन समाजासाठी काहीतरी करण्यासाठी प्रेरणा देणारा आज की नारी क्लब याचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला, विशेष म्हणजे या कार्यक्रमात तीन घंटे उसाहात आनंद लुटणाऱ्या एका महिलेची *वंडर वूमन* म्हणून आजच्या नारिक्लब ची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती, केली तिचे नाव डॉक्टर जयश्री राठोड हे असून त्या प्रत्येक महिन्याच्या कार्यक्रमात आजच्या नारीच्या सहभाग घेऊन क्लब साठी आणखीन चांगले कार्य करण्यास प्रेरित होतील असे त्यांनी सांगितले, यावेळी आजच्या नारी क्लबचा उद्देश व कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला असे आपले मनोगत *डॉक्टर,सूर्यवंशी मॅम, यांनी दिले* तसेच *मीनाताई चव्हाण यांनी सुद्धा कार्यक्रमाच्या यशस्वी साठी व कार्यक्रमाच्या आयोजकांचे खूप आभार मानले,
“आपल्या घरी काम करणार्या बईना सुद्धा इथे स्टेज वर बोलून तिचा मानसन्मान करून तिच्याकडून आपण काही शिकू शकतो हे महिलांना दाखवून दिले”बऱ्याच महिलांना हा कार्यक्रम खूप आवडला असून दर महिन्याच्या कार्यक्रमाला आम्हाला आवर्जून बोलवा असे प्रत्येकीनी विनंती केली, कार्यक्रमाच्या शेवटी भोजनाचा आनंद घेऊन महिलांनी आजचा दिवस खूप छान गेला असे सांगितले, कार्यक्रमांमध्ये सेल्फी पॉईंट होता, तसेच प्रत्येकीला टीआरा गिफ्ट देऊन रेड कॉर्पेट वर प्रत्येक महिलेचे स्वागत करण्यात आले, प्रत्येक महिलाही स्वतःमध्ये स्पेशल असते ही जाणीव प्रत्येक महिलेला करवून दिली, या कार्यक्रमाच्या आयोजीका रेश्मा शिंदे व नम्रता लोखंडे,ममता लोखंडे,अध्यक्ष सचिव यांनी कार्यक्रमास उपस्थितांना पुरे पूर्ण आनंद देण्याच्या प्रयत्न केला तसेच कार्यक्रमात 
सौ.सारिका गायकवाड,माधुरी मुंदडा,अरुणा जाधव, कल्पना पापिंवार, वैशाली गायकवाड यांनी देखील कार्यक्रम साठी सहकार्य केले,



