स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव माझी माती, माझा देश अभियानांतर्गत अमृत कलश यात्रा हिवरा संगम येथील जी.प शाळेच्या वतीने मोठ्या उत्साहात!

महागाव/प्रतिनिधी ( संदीप कदम):गटविकास अधिकारी महागाव यांच्या सूचनान्वये तालुक्यात सर्वत्र जिल्हा परिषद शाळेत दिनांक २१ सप्टेंबरला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त अमृत कलश यात्रा तालुक्यात सर्व शाळेत मोठ्या उत्साहात पार पडली याच अनुषंगाने हिवरा संगम येथील विविध जिल्हा परिषद शाळेच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली.
या प्रभातफेरीमध्ये शासनाच्या आदेशानुसार अमृत कलश योजनेअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी माझी माती माझा देश, मेरी मिट्टी मेरा देश, जय जवान जय किसान अशा विविध उत्साही घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला प्रभात फेरी दरम्यान गावातील नागरिक ,शेतकरी यांच्याकडून माती किंवा ज्यांच्याकडे शेती नाही त्यांच्याकडून एक चमचा तांदूळ अमृत कलश मध्ये जमा करण्यात आला.
सदर प्रभातफेरी मध्ये गावातील सरपंच सौ.मेघा बोरुळकर, उपसरपंच शरद पाटील, ग्राम पंचायत सदस्य राजूभाऊ धोतरकर , माजी सरपंच डॉक्टर धोंडेराव बोरुळकर, शिरीष बोरुळकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षसह शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य , ग्रामपंचायत कर्मचारी, व पत्रकार बांधव तसेच केंद्रीय मराठी शाळा मुख्याध्यापक श्याम बांडे सर ,दादाजी नगर मराठी शाळा मुख्याध्यापक शरद सावनकर , सहशिक्षक व्हि.एस.बैलीम (दादाजी नगर). सहशिक्षिका रेखा धवणे ,सहशिक्षिका स्नेहल पाटील, सौ. संगिता बडुरे (हिवरा केंद्र शाळा). हिवरा उर्दू शाळेचे मुख्याध्यापक सैय्यद झाकीर सर, सहशिक्षक एजाज खान सर उपस्थित होते.



