ईतर

भीम टायगर सेनेच्या वतीने मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा जाहीर सत्कार!

 

पुसद :आज६ जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय विश्रामगृह पुसद येथे भीम टायगर सेनेच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार अखिलेश अग्रवाल हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी पुसदचे सुहास गाडे साहेब हे होते तसेच पोलीस स्टेशन वसंत नगरचे ठाणेदार प्रवीण नाचणकर साहेब होते पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड साहेब होते तसेच प्राध्यापक दिनकर जी गुल्हाने हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे आयोजक किशोर कांबळे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रस्ताविक विष्णू सरकटे यांनी केले ६ जानेवारी जानेवारी पत्रकार दिन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे वृत्तपत्र काढून समाजाला न्याय देण्याचे काम केले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे कारण पत्रकारितेमुळे समाजाला समता स्वतंत्र बंधुत्व न्याय मिळतो असे आपल्या प्रस्ताविकात नमूद केले नंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुहास गाडे साहेब उपविभागीय अधिकारी पुसद यांनी आपल्या भाषणात पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यानंतर प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते तसेच कार्यक्रमाचे आयोजक किशोर कांबळे जिल्हा अध्यक्ष भिम टायगर सेना यांच्या हस्ते क्रमवार सर्व दैनिक पत्रकाचे प्रतिनिधी तसेच साप्ताहिकाचे संपादक प्रतिनिधी यांना शाल ग्रामगीता पेन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आयोजक किशोर कांबळे अण्णा दोडके दीपक गायकवाड जनार्दन झोडगे प्रभाकर खंदारे नारायण दोडके मधुकर ठोके बबन पाईकराव राहुल झिंजारे राजकुमार पठाडे विनोद राठोड गौतम खडसे विनोद जाधव तसेच भिम टायगर सेनेचे असंख्य कार्यकर्ते यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जनार्दन गजबे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सुनील खाडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close