ईतर

प्रा.जी.व्ही.बन उर्फ सौ. अनुश्री अनिल पुरी. यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती.कडून डॉक्टरेट प्रदान

व्यवस्थापनासह दशनाम गोसावी समाज संघटने कडून सन्मान!

यवतमाळ/ जिल्हा प्रतिनिधी(गजाननजी भारती सर): पुसद तालुक्यातील फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद येथे पदव्युत्तर समाजशास्त्र विभागात कार्यरत तथा श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय पुसद येथे समाजशास्त्र विभागात प्रभारी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्रा.जी.व्ही.बन उर्फ सौ.अनुश्री अनिल पुरी यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती कडून मानव विज्ञान विद्याशाखेतील समाजशास्त्र विषयातील आचार्य (Ph.D) पदवी दि,२९ ऑगस्ट २०२४  रोजी प्रदान करण्यात आली आहे.  प्रामुख्याने पि.एच.डी. संशोधनातिल त्यांचा विषय *”पश्चिम विदर्भातील बंजारा जमातीचे ग्रामीण क्षेत्रातील बदलते प्रतिमान : एक समाजशास्त्रीय अध्ययन”* असून यासंशोधनं विषया करीता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती येथील समाजशास्त्र विभागात कार्यरत असलेले डॉ. किशोर उत्तमराव राऊत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रा.जी.व्ही.बन उर्फ सौ. अनुश्री अनिल पुरी यांनी यश प्राप्त केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.तसेच त्यांनी त्यांच्या अथक परिश्रमाच्या यशाचे श्रेय त्यांचे आई,वडील,मार्गदर्शक व त्यांचे कुटुंब, जनता शिक्षण प्रसारक मंडळ, पुसद. सचिव तथा माजी ‌ कॅबिनेट मंत्री मा. मनोहरभाऊ नाईक, अध्यक्ष श्री. जयभाऊ नाईक, संपूर्ण नाईक परिवार व उपरोक्त दोंन्हीही महाविद्यालयाचे प्राचार्य , प्राध्यापक, प्र.प्रबंधक श्री.उमेशभाऊ चव्हाण.व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.तर याच यशाची दखल घेऊन यवतमाळ जिल्हा दशनाम गोसावी समाज संघटनेच्या वतिने एका भव्य सन्मान सोहळ्यात सन२०२४-२५  यशस्वी नारीशक्तीचा सन्मान देत सन्मानित करण्यात आले. यावेळी यवतमाळ जिल्हा दशनाम गोसावी समाज संघटनेच्या वतिने जिल्हाध्यक्ष संदीप गिरी, सचिव दिलीप पुरी कार्यक्रमाचे अध्यक्ष अस्थिरोग तज्ञ डॉ.व्ही.के.गिरी , प्रमुख वक्ते तथा लेखक प्रा.वसंत गिरी,सहाय्यक पोलीस निरीक्षक आमोल पुरी, सहायक वनसंरक्षक संदीप गिरी, डॉ. अशोक गिरी, माजी अध्यक्ष प्रफुल्ल पुरी, कार्याध्यक्ष पवन बन, कोषाध्यक्ष योगेश गिरी, उपाध्यक्ष सुहास पुरी,दिपक गिरी, रणजित गिरी, संघटक दिलीप सुखदेव पुरी,राजु गिरी, अविनाश भारती, चंद्रकांत गिरी, नितीन गिरी, दीपक गिरी, किशोर गिरी, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गजानन भारती महागावकर, मनोज गिरी, राहुल पुरी, संदीप पुरी, अरुण गिरी, राजकमल भारती, मनीष बन, दिलीप गिरी, कैलास पुरी, आशिष गोसावी, गजानन गिरी, आदींसह समाज बांधवांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close