वाशिम-यवतमाळ लोकसभा संघा करीता ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांचा उमेद्वारी अर्ज दाखल तर भावना गवळीचा पत्ता कट महायुतीकडून संजय राठोड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता!

यवतमाळ : वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाकरीता महाविकास आघाडीकडून लोकप्रिय उमेद्वार संजय उत्तमराव देशमुख यांनी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे तथा राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांचे मार्गदर्शन व उपस्थितीमध्ये आणि प्रचंड जनसागराच्या सर्वसाक्षीने उमेदवारी अर्ज दाखल.
उमेद्वारी दाखल करतेवेळी पुसद दिग्रस,कारंजा, ओ, वाशिम, मंगरूळपिर, यवतमाळ येथील महाविकास आघाडी मधील सहभागी सर्वच राजकिय पक्ष नेते आणि कार्यकर्ते यांनी दाखवीले प्रचंड ऐक्य.
तसेच हजारो महाविकास आघाडीचे कार्यकर्त्याची व मतदारांनी हजेरी लावली होती पुसद विधानसभा मतदार संघामधून प्रचंड प्रमाणात उपस्थिती.संजय देशमुखांनी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यानंतर जाहीर सभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपावर प्रहार केलाय. बहुत हुए खोके-धोखे, अब घर बैठे रोके, अशी टीका त्यांनी महायुतीवर केलीय.ईडी, सीबीआय भाजपाचे मित्र : ईडी, सीबीआय, आयटी भाजपाचे तीन मित्रपक्ष असल्याचा हल्लबोल देखील आदित्य ठाकरेंनी भाजपावर केलाय. भाजपाची युज अँड थ्रो पॉलिसी आहे. दुसरे पक्ष फोडून भाजपानं मिंध्ये सरकार बनवलं. या सरकारनं महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवल्यानं राज्यातील युवकांच्या नोकऱ्या गेल्या. सरकारी पदभरती परीक्षेचे पेपर फुटत आहे. त्यामुळं आपलं सरकार आल्यास पदभरतीचे पेपर फोडणाऱ्यांना फोडून काढेल, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे. तसंच पेपर फोडणाऱ्यांना कमीतकमी १० वर्षे शिक्षा झाली पाहिजे, त्याबाबत आमचं सरकार कायदा करेल, असं देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. सध्याच्या सरकारमधील मंत्रिमंडळात महिलांवर अत्याचार करणारे लोक बसले आहे, अशा शब्दात त्यांनी विद्यामान मंत्री संजय राठोड यांना देखील टोला लगावला.
या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील बंडखोर आमदारांवर प्रहार केलाय. महायुतीत गेलेल्या आमदार, खासदारांनी विचार सोडला, जनतेला सोडलं, निष्ठा सोडली. बंडखोरांनी पळून जात दिल्लीत गुडघे टेकले. जनतेला सोडून सत्तेसाठी पळून गेलेल्यांच्या विरोधात नागरिकांनी लोकसभेची निवडणूक हाती घेतल्याचं रोहित पवार यांनी म्हटंल आहे. घराणेशाही, पक्ष फोडून निवडणूक लढवणं लोकांना आवडत नाही. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. राज्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, अशी शपथ मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. पण आज दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्याचे कृषिमंत्री कुठं आहेत? अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केलीय. महायुतीनं संजय राठोड यांना तिकीट दिलंय. त्यामुळं त्यांनी आता चित्रा वाघ यांना प्रचारासाठी बोलवायला हवं असा उपरोधिक टोला रोहित पवारांनी महायुतीला लगावला आहे. तसंच गद्दारांना पोहरागडची देवी आशीर्वाद देणार नाही, अशीही टीका त्यांनी केली.
या सभेला आमदार आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, आमदार धीरज लिंगाडे, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके ययाती नाईक डॉ.नदीम यांच्या प्रमुख मार्गदर्शन व उपस्थितीमुळे महाविकास आघाडी सह उपस्थित मतदारामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. तर लोकप्रियतेचे उच्च शिखर प्राप्त केलेले महाविकास आघाडीचे उमेद्वार संजय उत्तमराव देशमुख यांचा विजय होण्याचे स्पष्ट संकेत मतदाराकडून मिळत होते.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी लकी मतदारसंघ मानला जातो. २०१४, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात नरेंद्र मोदी यांनी याच मतदार संघातून केली आणि सलग दोन वेळा ते पंतप्रधान झाले.
२०२४ च्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथे महिला मेळावा घेऊन फोडला. गवळींनी मोदींना राखी बांधली होती. त्यामुळे त्यांच्यात भावाबहिणीचे नाते आहे.तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघ विद्यमान खासदार भावना गवळी यांचा बालेकिल्ला मानला जातो. गवळी या मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आल्या आहेत. सहाव्यांदा सुद्धा निवडणूक लढण्यास त्या इच्छुक आहेत. मात्र अद्याप त्यांच्या नावाची घोषणा महायुती कडून करण्यात आली नाही. भाजपने केलेल्या सर्वेनुसार खा. भावना गवळी यांच्याबद्दल मतदारांमध्ये रोष असल्याने त्यांची उमेदवारी धोक्यात असून महायुतीकडून उमेदवार बदलण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उमेदवारी घोषित करण्यासाठी वेळ लागत असल्याची चर्चा सुरू असुन भावना गवळीचा पत्ता कट होणार आहे.यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये शिंदे सेनेच्या वाट्याला आला आहे. उद्धव ठाकरे गटाने येथून माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांना मैदानात उतरविल्याने संजय देशमुख हे मंत्री संजय राठोड यांचे कट्टर विरोधक मानले जातात.त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी संजय राठोडांना उमेदवारी दिल्यास ‘हाय व्होल्टेज’ लढत होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.यवतमाळ मतदारसंघ शिंदे सेनेच्या वाट्याला असल्याने येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे.



