स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीत रिपब्लिकन (आठवले) पक्षाला सन्मानजनक जागा द्या; स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्याची भाजपकडे मागणी!

पुसद :आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाला सन्मानजनक जागा न दिल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचे पक्षाच्या सूत्रातून माहिती देण्यात आली आहे.आज दि.५ नोव्हेंबर रोजी संभाजीनगर येथील सांस्कृतिक भवन तथा बुद्धविहार मध्ये रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका दि.४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:०० वाजता जाहीर झाल्यानंतर नगर पालीका,जिल्हा परिषद व पंचायत समीतीच्या निवडणूक अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची पुसद तालुका व शहर आढावा बैठक पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाठोरे याच्या अध्यक्षतेखालील व पुसद शहर अध्यक्ष लक्ष्मण कांबळे याच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. 
सदर बैठकीत प्रामुख्याने होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणूक बाबत चर्चा करण्यात आली. नगरपरिषद निवडणूक रिपब्लिकन पक्ष ताकतीने लढविणार असुन मित्रपक्ष भारतीय जनता पक्षासोबत युती असल्याने रिपब्लिकन पक्षाने लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत युती धर्म पाळत संपूर्ण राज्यात भाजपा व समर्थित उमेदवारास निवडणुकीत प्रचार व प्रसार करुण आपली जवाबदारी पार पाडली आहे, यामुळे महायुती असलेल्या पक्षाची सत्ता देखील आली आहे.भाजपच्या वरीष्ठ मंडळींकडून नगरपरिषद निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला जागा सोडण्यात येतील असे आश्वासन सुद्धा देण्यात आले होते.आगामी होऊ घातलेल्या पुढील महिन्यात नगरपरिषद निवडणुकीत एकूण १५ प्रभाग असून त्यामध्ये (चार-४) प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेले आहे आरक्षीत प्रवर्गातील कीमान तीन जागा यामध्ये प्रभाग क्रमांक ११ क्रमांक १२ व १४ ह्या रिपब्लिकन पक्षाला द्याव्यात अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भा ज.पा.च्या जिल्हा अध्यक्षा आरतीताई फुपाटे व वरीष्ठ मंडळी कडे करण्यात आली आहे.तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या कडुन सुध्दा रिपब्लिकन पक्षाचा नक्कीच विचार करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.परंतु भारतीय जनता पक्षाकडून सन्मानजनक जागा व वागणूक न मिळाल्यास ईतर समविचारी पक्षासोबत युती करून नगरपरिषद निवडणूक लढविली जाईल असा ठाम निर्धार व निर्णय पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून सदर बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस रिपाइं पक्षाचे पुसद तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाठोरे, शहर अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, ता.उपाध्यक्ष प्रकाश धुळे, शहर सचिव अंबादास वानखडे, ता.सचिव अमर पाटील, नितेश खंदारे, अनंता कांबळे, सुभाष पवार, संदिप वाढवे, विजय निखाते,भास्कर बनसोड,अवि खिल्लारे सह इतर पदाधीकारी उपस्थीत होते.



