ईतर

रमाई च्या सर्वच लेकीनी माता रमाई च्या त्यागाचे सदैव स्मरण करावे:-संतोष सुरवाडे

पुसद : येथील संभाजीनगर मध्ये ७ फेब्रुवारी रोजी रमाई जयंती निमित्त त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा त्याग आणी समर्पित कार्य हेच आमच्या जीवनाच सोन आहे हे आजच्या सर्वच रमाईच्या लेकिनी स्मरण करुन रमाई च्या विचाराचा वारसा समर्थ पने चालवावा.असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष सुरवाडे यांनी

आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडले तर डाॅ. बाबासाहेब  आंबेडकर यांना माता रमाईची खंबीर साथ आणी सहकार्य लाभल्यामुळे उपेक्षितांच्या जीवनोतथानासाठी त्यानी हाती घेतलेल्या कार्याला दिशा मिळाल्या असे प्रतिपादन आपल्या भाषणातून प्रा. डाॅ.कल्याण साखरकर यानी व्यक्त केले.

लुंबीनी बुध्द विहार संभाजीनगर पुसद येथे आज गौतमी बहुउद्देशीय संस्था व लुंबीनी महीला मंडळाच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.माता रमाई आंबेडकरांनी त्याग केल्यामुळेच आपल्याला महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे समस्त शोषीत वंचित बहुजन समाजा साठी आयुष्यभर कार्य करीत राहीले त्याच्या कार्यात रमाईचा मोठा वाटा होता असे प्रतिपादन रमाई उद्योजक पुरस्कार प्राप्त धम्मभुषण जेष्ठ शिक्षक तथा नवनिर्वाचित शिक्षण सभापती विठ्ठलरावराव खडसे यांनी केले तर रमाई च्या विचाराचा वारसा आताच्या रमाईच्या लेकीनी न डगमगता समर्थपने आपल्या लेकरांना संस्कारक्षम बनवून चांगले शिक्षण द्यावेत हीच खरी माता रमाई आंबेडकरांना अभिवादन होईल असे विचार संभाजी ब्रिगेड चे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख यांनी आपल्या अभिवादन पर भाषणातून व्यक्त केले. तर माता रमाई आंबेडकरांच्या त्यागामुळेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मोठ सामाजिक परिवर्तन करू शकले असे प्रतिपादन केले तर रिपब्लिकन आठवले पक्षाचे अध्यक्ष तथा पत्रकार लक्ष्मण कांबळे यानी आपल्या भाषणातून रमाई जयंतीच्या शुभेच्छा व्यक्त केले.

सर्वप्रथम माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बामसेफ चे प्रशिक्षण महासचीव संतोष सुरवाडे होते तर प्रमुख उपस्थिती शिक्षण सभापती न.प. विठ्ठलरावराव खडसे व नगरसेवक शिल्पाताई देशमुख तथा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख हे होते तर प्रमुख मार्गदर्शक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक संघटनेचे सहसचिव प्रा.कल्याण साखरकर,लक्ष्मण कांबळे अध्यक्ष रिपाई(आठवले), बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजेंद्र नाईक, संतोष अंभोरे अध्यक्ष भीमशक्ती, विजय बहादुरे अध्यक्ष समता सैनिक दल, प्रा.दादाराव अगमे,ॲड. जांभुळकर होते.तर कार्यक्रमाचे सुरेख आयोजन गौतमी बहुउद्देशीय संस्था व लुंबीनी महीला मंडळ संभाजीनगर पुसद च्या सर्व महीला भगीनी सह रंगनाथ भाऊ धीरे ‘गजानन भाऊ धाबे नितेश खंदारे विजय गवारे सह संभाजीनगर पुसद च्या सर्वच मंडळींकडून परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुरेख आणी शिस्तबद्ध संचालन यशदा चे विषयतज्ज्ञ प्रा. अंबादास वानखडे यानी केले तर आभार प्रदर्शन मंडळाच्या सचिव सौ. छायाताई कांबळे यानी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close