ईतर

स्व.सतीषभाऊ बयास यांनी आयुष्यभर दिलेल्या प्रेमाची आणि आठवणींची उणीव भासत राहील-संभाजी टेटर 

पुसद नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष स्व.सतीषभाऊ बयास यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन!

पुसद: नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष स्व.सतीषभाऊ बयास यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त मनिषभाऊ शाह मित्र मंडळांच्या वतीने आज शाह डेव्हलपर्स कार्यालयात पवित्र स्मृतीस विविध मान्यवरांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

आज दि.८ फेब्रुवारी २०२६ रोजी, रविवार सकाळी १०.०० वाजता मनीष भाऊ शाह मित्र मंडळ यांच्या वतीने शाह डेव्हलपर्स कार्यालय, पुसद नगरपरिषदे माजी नगराध्यक्ष स्व.सतीश भाऊ बयास यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यातआले होते. हा कार्यक्रम संभाजीराव टेटर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मनीष भाऊ शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सूत्रसंचालन प्रा. वसंत राठोड यांनी केले तर प्रा. बाबुसिंग राठोड यांनी स्व. सतीश भाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

अध्यक्षीय भाषणात संभाजीराव पाटील यांनी त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाचा गौरव केला.त्याच्या “आठवणींना उजाळा दिला आणि स्व.सतीषभाऊनी आयुष्यभर दिलेल्या प्रेमाची आणि आठवणींची उणीव भासत राहील असे उद्गार काढले.या भावपूर्ण कार्यक्रमास मनिषभाऊ शाह,बाळासाहेब म्हस्के,ॲड. विरेन राजे,नितीन कोठारी,डॉ.पंकज जयस्वाल,अक्षय महाकाल (न.प.सदस्य पुसद)बाबाराव उबाळे,मनोहर बोंबले,शंकर माहूरे संजय पवार,कुणाल बनसोडे ,बाबू तातेवार,अन्वर जिंद्रान,गजानन जमगडे,प्रवीण जामगडे,अजय कोटलवार,ललित भाई चव्हाण,राहुल भाऊ कांबळे, ,विशाल कांबळे, अमोल साखरे,शंभू आगासे, अन्वर अली ठेकेदार,सोनू पाटील,अविनाश पवार (संचालक,कृषी उत्पन्न बाजार समिती),अजय पवार,देवराव जाधव, सुशील दीक्षित,राजू मुराई,भगवान धुळे,संजय चव्हाण,प्रल्हाद वायकुळे, गजू वायकुळे, बाळू उखळकर, प्रकाश नेमाते,अरविंद चव्हाण,नीरज रतन पवार,बाळू चव्हाण,राजू पतंगे,राज सावळे,सूरज ठाकूर इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close