ईतर

उमरखेड तालुक्यात ‘वंचित’ मध्ये अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर;जिल्हा पदाधिकाऱ्यासह तालुका पदाधिकाऱ्यांचे आझाद समाज पार्टीत जाहीर प्रवेश

उमरखेड वंचित पक्षांमध्ये मोठी खिंडार ; राजकीय समीकरण बदलणार?

उमरखेड/ प्रतिनिधि: तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी काल खासदार चंद्रशेखर आझाद रावण यांच्या आझाद समाज पक्षात प्रवेश केल्याने उमरखेड तालुक्यात वंचित पक्षाला खिंडार पडली.राज्यात लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. उमरखेड महागाव मतदार संघात सुध्दा वंचित चा परफॉर्मन्स बऱ्यापैकी होता. तब्बल २२ हजार मत घेत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यास वंचीत बहुजन आघाडी यशस्वी झाली होती. आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष असताना उमरखेड तालुक्यात काल राजकीय भूकंप घडला. जिल्हा महासचिव जॉनटी उर्फ प्रशांत विनकरे यांच्या सह तालुका अध्यक्ष संतोष जोगदंडे, विष्णु वाढेकर, देवानंद पाईकराव, गोलू मुनेश्र्वर, रविंद्र हापसे , माजी जिल्हाप्रमुख प्रमोद राऊत, माजी जिल्हा उपाध्यक्ष उकेश्वर मेश्राम, जिल्हा संघटक अश्फाक शेख, बाबुराव नवसागरे ,महागाव शहराध्यक्ष पप्पू कवळे, अतुल वाढवे, तालुका उपाध्यक्ष् विनोद गाडगे, परसराम आडे, प्रफुल दिवेकर सह तालुक्यातील अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी काल विश्राम गृहात झालेल्या बैठकीत आझाद समाज पार्टी चे प्रदेश मुख्य महासचिव मनीष साठे यांच्या हस्ते भीम आर्मीच्या जिल्हाप्रमुख अशोक भालेराव यांच्या उपस्थितीत आझाद समाज पार्टी पक्षात प्रवेश केला. यामुळें उमरखेड तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी ला मोठा झटका बसला आहे.वंचित च्या अंतर्गत गट बाजी मुळे अनेक प्रमुख पदाधिकारी दबक्या आवाजात गुदमरल्याचे बोलत होते. तर अनेक वेळा उमरखेड च्या विश्राम गृहात पक्षाच्या बैठकीत जिल्हा कमिटीसमोर पक्षातीलच दोन गटा चा वाद विकोपाला गेला होता. याचा फटका शेवटी पक्षाला बसला असून वंचित चे तालुक्यातील अनेक मुख्य पदाधिकाऱ्यांनी अखेर आझाद समाज पक्षात प्रवेश करत स्वतः ला ‘ आझाद ‘ केल्याचे बोलल्या जात आहे.

वंचित चे तालुकाध्यक्ष पद सांभाळत असताना सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी जिवाचे रान केले कार्यकर्त्यासाठी तुरुंगवासही भोगला पण एन निवडणुकीच्या काळात सक्रिय पदाधिकाऱ्यांना पदावरून काढून निष्क्रिय कार्यकर्त्यांचा भरणा करण्यात आला या विषयी वरिष्ठाकडे या विरोधात अनेक वेळा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे वंचितला सोडचिठ्ठी देऊन आझाद समाज पार्टीत प्रवेश केला-संतोष जोगदंडे जिल्हा महासचिव आझाद समाज पार्टी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close