ईतर

पुसद नगर परिषदेचे शिक्षण सभापती प्रा.विठ्ठल खडसे सर यांना ‘धम्म भूषण’ पुरस्काराने सन्मानित!

यवतमाळ /प्रतिनिधी:यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात महाबोधी बहुउद्देशीय संस्था अमरावती संस्थेची शाखा वटफळी येथे दि.३ फेब्रुवारी२०२६ रोजी मंगळवार ला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ३४ व्या बौद्ध धम्मपरिषद या ठिकाणी संपन्न झाली. त्यावेळी भगवान गौतम बुद्धाचा विश्व कल्याणकारी मार्ग स्विकारून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत उभा करण्यासाठी सतत धडपडणाऱ्य सामाजिक, कार्यकर्त्यांचा तसेच सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक या क्षेत्रातील आपले कार्य उल्लेखनिय कार्य करून पुढिल पिढीला सकारात्मक दिशा देणाऱ्या पुसद नगरपरिषदेचे शिक्षण सभापती प्राध्यापक विठ्ठल खडसे सर यांना सहपत्नीक “धम्म भूषण पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले आहे त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील वटफळी येथे महाबोधी बहुउद्देशिय संस्था, अमरावती शाखेच्या महाबोधी बहुउद्देशिय संस्था, वटफळीच्या वतीने बुद्ध वर्ष २५६९ दि.३ फेब्रुवारी२०२६ रोजी मंगळवार ला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ३४ व्या बौद्ध धम्मपरिषद या ठिकाणी संपन्न झाली.यावेळी भगवान गौतम बुद्धाचा विश्व कल्याणकारी मार्ग स्विकारून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत उभा करण्यासाठी सतत धडपडणाऱ्य सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक या क्षेत्रांत उल्लेखनिय कार्य करून पुढिल पिढीला सकारात्मक दिशा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ताना सन्मानित करण्यात आले यावेळी भदन्त डॉ. सत्यानंदजी महाथेरो (येनाडा) भदन्त प्रा. डॉ. एम. सत्यपाल महाथेरो (औरंगाबाद) यांच्या हस्ते व भदन्त नागघोष महाथेरो (अध्यक्ष, महाबोधी बहुउद्देशिय संस्था, अमरावती शाखा-वटफळी), भदन्त डॉ. हर्षबोधी महाथेरो (उपाध्यक्ष, महाबोधी बहुउद्देशिय संस्था, अमरावती शाखा- वटफळी), आणि भदन्त धम्मदीप महाथेरो (सचिव, महाबोधी बहुउद्देशिय संस्था, तथा अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल सोसायटी, मह मध्यप्रदेश) भदन्त धम्मशरण थेरो व भिक्षु संघाच्या उपस्थितीत पुसद नगरसेवक तथा शिक्षण सभापती प्राध्यापक विठ्ठल खडसे सर यांना सहपत्नीक “धम्म भूषण पुरस्काराने” गौरविण्यात आले आहे. यावेळी धम्म परिषदेला अनेक बौद्ध धम्म वाशी उपस्थित होते.यापूर्वी सुद्धा १४ अखिल भारतीय साहित्य संमेलनात मातोश्री रमाई उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच २०२३ रोजी रिपब्लिकन वार्ता समाज रत्न सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले होते.तर २०२४ मध्ये विदर्भ केसरी भूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.आयुष्यमान दीपक भवरे, जांभुळकर सर, नरेंद्र पाटील सर वानखडे सर, शिर शिरभिडे सर आनंद भगत, आयुष्यामध्ये ललिता विठ्ठलराव खडसे, देशोन्नती नेहा राहुल भगत, आयुष्यमान ल.पू. कांबळे, सुखदेवराव भगत विविध सामाजिक संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close