लाखो रुपयांच्या गांजाची शेती करणारा पोलिसांच्या ताब्यात; उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकांची मोठी कामगिरी!
ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत गांजाची लागवड तरीही बिट जमादार अनभिज्ञ; उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाला करावे लागते कारवाई!

पुसद : ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चिखली कॅम्प येथे एका शेतकऱ्याने आपल्या शेतात गांजाची लागवड केली आणि तो स्वतः या गांजाची रखवाली करीत आसल्याची गुप्त माहिती पुसद उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी उपविभागीय पोलीस पथकाने संयुक्तरित्या छापा टाकला असता, शेतात लाखो रुपयाचे गांजाची झाडे लावल्याचे आढळून आले. पोलिसांनी या प्रकरणी चिंतामण हरिभाऊ डाखोरे वय (६५) वर्ष वर्ष रा. चिखली कॅम्प या शेतकऱ्याला अटक केली असून, त्याच्या शेतातून एकूण ८४ किलो ९०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत १२ लाख ७३ हजार ५०० रुपये इतकी आहे.
याबाबत पुसद उपविभागीय पोलीस पोलीस विभागाच्या सूत्राने दिलेली माहिती अशी की, पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चिखली कॅम्प येथील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात शेत सर्वे नं. ४२ क्षेत्रफळ २हे ३० आर दुसरा शेत सर्वे नं.४३ क्षेत्रफळ ००.५७आर मध्ये मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गांजाची लागवड केली होती. आणि या गांजाची स्वतःच रखवाली करीत होता. परंतु या घटनेचा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व बीट जमादार यांना थांग पत्ता सुद्धा नव्हता किंवा या पोलीस स्टेशनच्या बीट जमादार व पोलीस निरीक्षकांनी दृतराष्ट्राचे जाणीवपूर्वक सोंग घेतले होते किंवा किंवा अर्थपूर्ण व्यवहारातून संबंधित पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची काही सबंध होते कां हे मात्र संशोधनाचा विषय आहे. किंवा ते खरंच अनभिज्ञ होते.परंतु दि,३० ऑक्टोंबर २०२५ रोजी पोहवा/६९८ सुनील मदने पोहवा/२१७७ शंकर टाळीकुठे पो.आ.४४ जुनेद सय्यद यांना गोपीनिय माहिती मिळाली की, पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चिखली कॅम्प येथे एका शेत शिवारात शेतकऱ्यांनी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा प्रतिबंधित गांजाची लागवड केली असून तो त्याची रखवाली स्वतः करीत आहे. त्यावेळी प्रभारी अधिकारी पुसद, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत, यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने चिंतामण हरिभाऊ डाखोरे यांच्या शेतावर संयुक्तरीत्या छापा टाकला असता आरोपीच्या शेतामधून ८४ किलो ९०० ग्राम गांजा जप्त करून त्याची प्रती १५०००/रुपये प्रमाणे एकूण किंमत १२ लाख ७३ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद येथे आरोपी विरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनचे, प्रभारी पोलिस अधिकारी पोउपनि सुरेंद्र राऊत, राहुल देशमुख, आम पोहवा / २१७७ शंकर टाळीकुटे पोहवा / रविंद्र गावंडे, पोहवा / विनायक चव्हाण पोहवा /सचिन बनकेवार पोहवा/मो. ताज, संताष राठेड, शोएब शेख, सर्व पो. स्टे. पुसद ग्रामीण जुबेर सैयद यांनी केली आहे.



