अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, आसरपेंडचा १०० टक्के निकालाची परंपरा कायम

पुसद:समाजीक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेली अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, आसरपेंड या शाळेचा नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२३ मध्ये १०० टक्के निकाल लागला आहे.यावर्षी शाळेमधून परीक्षेसाठी ३७ विद्यार्थिनी प्रविष्ट झालेल्या होत्या. सर्वच विद्यार्थिनी उत्तीर्ण झालेल्या असून, २० विद्यार्थिनी प्राविण्य श्रेणीत तर १५ विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत.शाळेतून प्रथम कु. दिक्षा गजानन डोंगरे ८९.८० टक्के, द्वितीय कु. दुर्गा विनोद जोगदंडे ८८.६० टक्के तर तृतीय कु. पल्लवी सखाराम तांबारे ८८.२० टक्के घेऊन उत्तीर्ण झाल्या आहेत.सर्व उत्तीर्ण विद्यार्थीनींचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यवतमाळ भाऊराव चव्हाण साहेब व समाज कल्याण निरीक्षक मीनाक्षी मोटघरे मॅडम,शाळेच्या मुख्याध्यापिका सविता घरजारे(ठाकरे) अधिक्षिका बोंतावार मॅडम, सहा शिक्षिका अमृते मॅडम , सहायक शिक्षक नाईक, पवार, लंबे, चव्हाण, प्रयोगशाळा सहायक लढे, कनिष्ठ लिपिक जगताप, जाधव या सर्वांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस विद्यार्थिनींच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



