कार्तिक पौर्णिमेच्या सोहळ्यासाठी विदर्भातील एकमेव ईजनी येथील कार्तिक स्वामी मंदिर भाविकांसाठी सज्ज:२७ नोव्हेंबरला भव्य महाप्रसादाचे आयोजन !

महागाव/प्रतिनिधी ( संदीप कदम ):-महागाव तालुक्यातील ईजनी येथून पश्चिमेस जवळपास दिड किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या दरदेवश्वर संस्थानातील कार्तिक स्वामी मंदिरात कार्तिक महिन्यात अनेक भाविक भक्त लाभ घेत असुन कार्तिक पौर्णिमा सोहळ्यासाठी गावकऱ्यानी जयत्त तयारी केली आहे.
विदर्भातील एकमेव कार्तिक स्वामीचे मंदिर महागाव तालुक्यातील ईजनी येथे असुन निसर्गाच्या कुशीत असलेल्या या मंदिराचा ईतिहास पुरातन असुन या गावाला गेल्या दहा दशका पासुन संताचा अनमोल वारसा लाभत आलेला आहे. त्यामधिल दरदेवश्वर संस्थानातील कार्तिक स्वामीचे मंदिर असुन परिसरातील ग्रामस्थाचे दैवत म्हणून या संस्थानची ओळख आहे.
दरदेवश्वर संस्थांन हे श्रीक्षेत्र माहुर दत्त शिखरचे पश्चिमद्वार असुन सती युगात अनेक ऋषी मुनीनी तपचर्या केली आहे. यामध्ये श्री जमताग्नी व दुर्वासा ऋषी यानी याठीकाणी बरेच दिवस तपचर्या केली, असा दत्तात्र्येय पुराणात उल्लेख आढळून येतो. श्री दुर्वासा ऋषी ध्यानमग्न असताना कार्तिकस्वामी आकाश मार्गे चालले असताना दुर्वासा ऋषीनी पाहीले असताना त्याना खाली बोलवले.कार्तिकस्वामीच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण आहे, अशी अखायीका सांगितल्या जात असुन जागृत देवस्थान म्हणून हे संस्थान ओळखल्या जाते. यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविकाची मांदीयाळी चालू आहे. मंदिराच्या बाजुला पुरातन जलकुंड असुन गायमुखातुन वाहता झरा आहे .येथील गावकरी व नवयुवक लोकसहभागातुन कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी धार्मिक कार्यक्रम करुन भव्य महाप्रसादाचे आयोजन केल्या जाते. दरवर्षी भाविकाची वाढती संख्या पाहुन उत्सव समितीने भाविकाची गैरसोय न होण्यासाठी युद्धपातळीवर उत्सव समिती कार्य करत असुन यावर्षी जवळपास पंधरा हजार भाविक येण्याची शक्यता असल्यामुळे नियोजन बद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे .ऐरवि महिलाना कार्तिकस्वामी चे दर्शन घेता येत नाही,.पंरतु वर्षातुन एकदाच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच महिलाना दर्शन घेता येते.अशी दंतकथा प्रचलित आहे. यावार्षी सुद्धा सोमवार दि.२७ नोव्हेंबरला भव्य महाप्रसादाचे आयोजन केले आहे परिसरातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकऱ्यातर्फे करण्यात आले आहे.



