गुरुजींची अर्त हाक आम्हाला फक्त शिकवु द्या;शिक्षक दिनी अशैक्षणिक कामाचा निषेध!

पुसद: पाच सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पण पुसद तालुक्यातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पुसदच्या वतीने शिक्षकांनी सामूहिक किरकोळ रजा घेऊन निषेध दिन म्हणून निषेध केला आहे. पाच सप्टेंबरला शिक्षक दिनी सर्व गुरुजनांची एकच हाक होती की आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या ज्ञानार्जन करू द्या! काही अशैक्षणिक कामाचे शिक्षकावर ओझे टाकल्यामुळे शासनाच्या उदासीन धोरण, शिक्षकांवर लादलेले अशैक्षणिक कामे, त्यात निरक्षर सर्वेक्षण, विविध अँप वर करावी लागणारी माहिती शिक्षण विभागा व्यतिरिक्त इतर विभागांच्या मोहिमांची जनजागृती अश्या कामातून शिक्षकांना पूर्णपणे मुक्त करा. फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्या. अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पुसदचे अध्यक्ष मधुकर मोरझोडे यांनी दैनिक पब्लिक पोस्ट प्रतिनिधी समोर ही व्यथा मांडली आहे. आमच्या विविध मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक दिनी ५ सप्टेंबरला सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. असून पुसद विभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना निवेदन दिले आहे या निवेदनावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती शाखा पुसद तालुक्यातील सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या सामूहिक रजा आंदोलनात बहुसंख्येने संघटनेचे शिक्षक सहभागी होते.