राजकिय

पुसद विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मिळालेलं मतांचं श्रेय हे फक्त माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचचं; दुसऱ्या कोणत्याही नेत्यांनी बॅनरबाजी करून श्रेय लाटू नये-ययाती नाईक!

येणाऱ्या काळात राजकारणाच्या समुद्रात ययाती नाईक यांच्या रूपाने नवं वादळ सुटण्याची शक्यता! 

पुसद:नुकताच यवतमाळ -वाशीम लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे.त्या निकालामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले.तर महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांना पुसद मधून ३ हजार १९८ मतांची लीड मिळाल्याने महायुतीचे नेते बॅनरबाजी करून श्रेय लाटत आहे. परंतु या महायुतीच्या नेत्यांना “आनंद होईना व दुःख लपविता येईना”अशी अवस्था असली तरीही बॅनरबाजी श्रेय लाटले जात आहे. त्यामुळे रविवार दि.९ जून२०२४ रोजी हॉटेल दीप संध्या येथे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती मनोहरराव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या उमेदवारास मिळालेले मते याच श्रेय हे फक्त आणि फक्त माजी मंत्री मनोहर नाईकांचे असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुसद मतदारसंघातील राजकारणाच्या समुद्रात नवं वादळ येणार असल्याची चाहुल लागली आहे.पुसद मतदारसंघ नाईक परिवाराचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.या मतदारसंघातील जनतेने आणि नाईक परिवाराने एकमेकांवर नेहमी विश्वास ठेवला आणि सतत पुढे वाटचाल केली. पुढे नाईक परिवारातील कुठल्याही पिढीच्या सदस्याला मागे वळून पाहण्याची वेळ या मतदारसंघात आली नाही. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत जनतेने भक्कम साथ दिल्याने नाईक परिवाराचे मतदारसंघात कायम वर्चस्व राहिलं.माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक आणि माजी मुख्यमंत्री कै. सुधाकरराव नाईक या पुसदच्या दोन सुपुत्रांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि त्यांच्या नेतृत्वात राज्याने हरितक्रांती तसेच जलसंधारणच्या माध्यमातून विकासाची पावलं टाकली.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्यानंतर त्यांचा वारसा त्यांचे पुतणे मनोहर नाईक चालवत आहेत. त्यांच्या सोबतीला त्यांचे दोन चिरंजीव ययाती नाईक आणि इंद्रनील नाईक आहेत.काही वर्षांपूर्वी मात्र नाईक परिवाराचा वारसा आता आमदार मनोहर नाईक आणि आमदार ॲड .निलय नाईक यांच्यात विभागला गेल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतं.ॲड.निलय नाईक यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि भाजपनेही त्यांना विधान परिषदेवर आमदार केलं. तेव्हापासून या भागात भाजपा झपाट्याने वाढली आणि त्याची झलक जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालामध्ये दिसली. त्यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीत पुत्र ययाती नाईक यांचा झालेला पराभव नाईक यांना एक धक्का होता.भाजपासोबत असलेले ॲड.निलय नाईक यांनी काका मनोहर नाईक यांच्याविरोधात उघडपणे भूमिका मांडत काकांविरोधात सन २००९ साली विधानसभेची निवडणूक लढवली होती. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नाईक विरुद्ध नाईक लढत झाली त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून इंद्रनिल मनोहर नाईक ८९,१४३मते मिळवून विजयी झाले.तर भाजपा पक्षाकडून ॲड.निलय मधुकर नाईक यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.फक्त विजयाचे अंतर: ९,७०१ मते.होती तेंव्हापासून आमदार इंद्रनील नाईक व आमदार ॲड.निलय नाईक यांची अत्यंत जवळीक वाढली असून मतदारसंघात एका दिलाने कामे करू लागले परंतु या दोघात तिसरा नको असल्याने ययाती नाईक यांना नाईक घराण्यातील निर्णयामध्ये दुय्यम वागणूक देण्यास सुरुवात झाली.पुसद विधानसभा मतदार संघाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी घरातील प्रत्येक निर्णयात डावलल्याची भावना व्यक्त करीत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक यांनी अखेर राजकारणात वेगळी वाट धरण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे नाईक कुटुंबात तीन पक्षाचे चिन्ह हातात घेताना दिसत आसल्यामुळे हे भिन्न पक्षांत कुटुंबीय विभागले जाते की काय.? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पुसद मतदारसंघात येणारी विधानसभा निवडणूक वादळी ठरणार असल्याचे चुणूक लागली आहे. या वादळाचा जोर आणि दिशा यांचा अंदाज मात्र अद्याप कुणाला आलेला नसला तरीही त्यातूनच काही अतार्किक हालचालींना वेग आला आहे.तसं भविष्यातील राजकारणातील समुद्रात नव्या वादळाची चिन्हे दिसू लागली की असुरक्षित जहाजावरचे सारे जण सुरक्षित आसरा शोधू लागताना. काहींना निमूटपणे समोर येणाऱ्या नव्या वादळाला तोंड द्यावे लागले याची चाहूल लागते कप्तानाने मात्र जहाज सोडून पळ काढायचा नसतो, असा एक संकेत आहे. या प्रसंगी जहाजासोबतच जलसमाधी घेण्यासही कप्तान तयार असला पाहिजे, असे मानले जाते. भरसमुद्रातील वादळात सापडलेल्या जहाजाचे हे नियम राजकारणात बऱ्याच अंशी लागू होतात. या मतदारसंघात भक्कम बस्तान बसविलेल्या आणि अनेक वादळे अंगावर घेऊन लीलया परतवून लावलेल्या नाईक घराण्याची परंपरा आहे. हे जहाज गेल्या निवडणुकीतील फटकाऱ्याने काहीसे खिळखिळे झाले त्यातच आता नवे वादळ समोर ठेपले आहे. या नव्या वादळाच्या वेगाचा अजून कुणालाच अंदाज नाही. त्यामुळे या खिळखिळ्या जहाजाऐवजी सुरक्षित आसऱ्यासाठी अनेक जणांची धावपळ सुरू होणार यात मात्र काही शंका नाही. ययाती मनोहरराव नाईक हे नाईक परिवारांमधील राजकीय परंपरानुसार माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या शब्दाला मान देऊन राजकीय वाटचाल करीत असताना परंतु मागील काळात एका राजकीय घटनात राष्ट्रवादी पक्षामध्ये फुट पडून अजित पवार गट निर्माण झाला तेव्हा आमदार इंद्रनील नाईक यांनी अजित पवार सोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आमदार इंद्रनिल यांनी माझ्यासोबत कोणत्याही प्रकारची चर्चा न करता किंवा मला विश्वासात न घेता त्यांनी स्वतः अजित पवार गटात सोबत जाण्याचा निर्णय घेतला.त्या घटना पासून आमदार इंद्रनिल यांनी पुसद विधानसभा मतदार विकास कामाबाबत चर्चा न करता मनमर्जीनुसार कामे करणे चालू केले.तसेच विकास कामांना बगल देण्यात आली तसेच लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवाराबाबत चर्चा सुरू असताना आमदार इंद्रनिल नाईक यांनी माझ्यासोबत किंवा आमच्या घरामध्ये चर्चा न करता मोहिनी नाईक यांचे नाव लोकसभा निवडणुकीत संभाव्य उमेदवार म्हणून चालू ठेवले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की पुसद विधानसभा मधील मतदार हे नाईक परिवारावर विश्वास ठेवून जवळपास ६० वर्षापासून विकास कामाकरिता निवडून देतात.पण आमदार इंद्रनिल नाईक हे पुसद विधानसभेचे आमदार झाल्यापासून ते विकास काम तसेच नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यात असमर्थ्य ठरत असल्याची घनाघाती टीका सुध्दा पत्रकार परिषदेमध्ये केली त्यांच्या या निर्णयामुळे पुसद विधानसभा मतदारसंघांमधील नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली असल्याने मतदारसंघातील नागरिकांसाठी मला झोपडी मधून बाहेर पडावे लागले. व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय भाऊ देशमुख यांना पाठिंबा जाहीर करून निवडून आणण्याचा निर्धार करून भरघोस मतांनी निवडून आणले. मी राष्ट्रवादी शरद पवार मूळ पक्षात अजूनही असून पुढील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री मनोहरराव नाईक साहेब सोडून जनतेच्या भल्यासाठी नाईक घराण्यातील कोणत्याही उमेदवारा विरुद्ध निवडणूक लढविण्यास तयार आहो.जर कुठल्याही पक्षाने तिकीट न दिल्या अपक्ष सुध्दा निवडणूक लढविणार असल्याची पत्रकार परिषदेत ययाती नाईक यांनी जाहीर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close