ईतर
मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन!

पुसद: येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६७ वा महापरिनिर्वाण दिन या निमित्त मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) पुसद तालुका अध्यक्ष माधवराव वैद्य यांनी सहकुटुंब तथा पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मानवंदना देण्यात आली यावेळी साहेबराव ठेंगे,नानाभाऊ जळगावकर, सिद्दिक अहमद लोहार, सय्यद नवाज अली,दीपक अवचार, नारायण कराळे,शामराव व्यवहारे, गणपत गव्हाळे, वर्षा माधवराव वैद्य, निखिल माधराव वैद्य, विठ्ठल उघडे, तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



