ईतर

पुसद शहरातील उद्योजग डॉ.सतीश चिद्दरवार यांचे नागपूर येथे निधन;आज पुसद येथील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार!

पुसद : येथील उद्योजक जमीन विकासात डेव्हलपर्स अँड बिल्डर्स शैक्षणिक संस्था चालक वैद्यकीय क्षेत्रातील मोठे नाव असलेले डॉ. सतीश वसंतराव चिद्दरवार (वय६४) यांचे दि३ नोव्हेंबर २०२६ रोजी डेंगूच्या आजाराने नागपूर येथील रुग्णालयात निधन झाले आहे. त्यांच्या चाहत्याने समाज माध्यमावरील पोस्टद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. डॉ. सतीश चिद्दरवार  यांच्या निधनामुळे  वैद्यकीय क्षेत्रासह बांधकाम व जमीन विकासक तसेच शैक्षणिक क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.पुसद शहरातील प्रतिष्ठित चिद्दरवार घराण्यातील प्रतिथयश डॉ. सतिष वसंतराव चिद्दरवार यांचे दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास निधन झाल्याची पोस्ट प्रसार माध्यमावर त्यांच्या चाहत्यांनी केली मृत्यूसमयी ते ६४ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली होती त्यावेळी सर्वात क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता येथील मोक्षधामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दोन दिवसांपुर्वी डॉ. सतीश चिद्दरवार यांना डेंग्यू झाल्याने नागपूर येथील हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु वरचेवर त्यांची तब्येत खालावत गेली. नागपूर, मुंबई येथून तज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते. मात्र त्या डॉक्टरांनाही यश आले नाही. अखेर डॉ. सतिष चिद्दरवार यांना हे लोक सोडून जावे लागले डॉ.सतीश चिद्दरवार यांच्या कल्पनेतून पुसद शहरात भव्य असे मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यात आले त्या रुग्णालयाला सुद्धा आज बारा वर्षे पूर्ण झाली असून विदर्भात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा या ठिकाणी मिळत असे. त्यांनी हॉस्पीटल मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील पीजी सुरु केले. त्यांचं सामाजिक व शैक्षणिक तसेच जमीन विकासात बांधकाम क्षेत्रातले कामही वाखाणण्यासारखे होते.सध्या जमीन विकासक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तसेच शैक्षणिक क्षेत्रातही आणि वैद्यकीय क्षेत्रातही मेडिकेअर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये ते व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहत होते. ज्योतिर्गमय इंग्लिश मिडीयम शाळा त्यांनी नावारुपास आणले त्यांच्या निधनाने संपूर्ण पुसद शहर व परिसर हळहळले. त्यांच्या मागे मोठे भाऊ ॲड. अतुल व जयंत चिहरवार, पत्नी डॉ. सुप्रिया, मुलगा डॉ. सजल, मुलगी डॉ. पूनम, स्नुषा डॉ. दीपाली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close