ईतर

महागाव येथे ‘साप्ताहिक लोकचिंतन’या वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):महागाव तालुक्यातील सर्व परिचित ज्येष्ठ पत्रकार,गझलकार, लेखक ,कवी, गजानन वाघमारे यांच्या ‘साप्ताहिक लोकचिंतन’ वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आज मंगळवार दि.१ ऑगस्ट २०२३ ला महागाव पंचायत समितीच्या सटवाराव नाईक सभागृहात मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नितीनभाऊ भुतडा (यवतमाळ जिल्हा समन्वयक भाजपा) प्रमुख पाहुणे रामदास पाटील सुमठणकर,तर प्रमुख उपस्थिती राजेंद्र नजरधने मा. आमदार, संभाजी दादा नरवाडे, करुणा शिरबीरे मा.नगराध्यक्ष महागाव, रामराव पाटील

नरवाडे, प्रज्ञानंद खडसे, किशोरजी भवरे, साहेबराव पाटील हिवरेकर मा. जिल्हा परिषद सदस्य,अनिल नरवाडे मा.जिल्हा परिषद सदस्य, स्वप्निल अडकिने, संदीपराव ठाकरे, प्रवीण ठाकरे,गुलाब जाधव बाजार समिती सभापती, किशोरदादा भवरे,रितेश भाऊ पुरोहित संपादक पॉलिटिक्स स्पेशल, महेंद्र कावळे, डी.बी.नाईक, शैलेश कोपरकर, प्रा. शरदचंद्र डोंगरे,विजय सूर्यवंशी साप्ताहिक महागाव वार्ता, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे,यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले व सर्व प्रमुख मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन यावेळी करण्यात आले यावेळी सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते लोकचिंतन या साप्ताहिकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच रामदास पाटील सुमठणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले यावेळी गजानन वाघमारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून

आपल्या २२ वर्षाच्या पत्रकार क्षेत्रातील अनुभव सुद्धा उपस्थित समोर व्यक्त केला माझ्या लोकचिंतन या साप्ताहिक खऱ्या अर्थाने गरजूंसाठी व गरिबांसाठी उपयोगात आणू असे मत व्यक्त केले यावेळी प्रज्ञानंद खडसे, अमोल चिकने सरपंच संघटना महागाव तालुका अध्यक्ष, प्रमोद उर्फ शाखा भरवाडे, विशाल पांडे

युवासेना जिल्हाध्यक्ष,हनुमंतराव देशमुख, गोविंदराव देशमुख, विठ्ठलराव वाघमारे, रवी वाघमारे, महेश नाईक, एस.टी.भगत,आजेश जाधव, गोर सेना महागाव तालुकाध्यक्ष, मनीषभाऊ जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष, विशाल पवार, बी. एन.चव्हाण, राजूभाऊ राठोड, यासह अनेक राजकीय व मित्र परिवारातील मान्यवरांसह पत्रकार नानाभाऊ ठाकरे, पवन रावते,विनोद कोपरकर, संजय पाटे, विवेक पांढरे, शैलेश वानखेडे, नरेंद्र नफते, सागर पाईकराव, फराज पठाण ,अमोल राजवाडे, प्रवीण जैस्वाल , सचिन उबाळे, माणिक मुनेश्वर, संजय कोपरकर, विजयराव

बोंपीलवार, भगवान फाळके, गजानन बोकसे, अमोल होडगिरे, तसलीम शेख, एमडी सुरोशे, गजानन साबळे, अंकुश कावळे, उमेश गाडे, गजानन दरोडे, धम्मानंद कावळे, रजत खाडे, लक्ष्मीकांत सरकटे,सदानंद जाधव, भैय्या पाईकराव,यासह तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचलन डॉ. संदीप शिंदे यांनी केले तर तर आभार शैलेश कोपरकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close