राजकिय

प्रस्थापितांनी वर्षानुवर्षे एकहाती सत्ता असुन शहराचा विकास केला नाही; “तुम्ही खा व आम्हालाही खाऊ द्या”या वृत्तीमुळे पुसद शहराचा विकास खुंटला -ॲड.अनिल ठाकुर यांचा पत्रकार परिषदेतून प्रस्थापितांना टोला!

पुसद न.प.चा येणाऱ्या काळात आर्थिक अंदाजपत्रक २ हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे आश्वासन!

पुसद : नगर परिषदेवर वर्षानुवर्षे एकहाती सत्ता असुनही या शहराचा विकास केला नाही तर शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी “तुम्ही खा व आम्हालाही खाऊ द्या”अशा प्रवृत्तींतुन जनतेच्या कराच्या पैशाची लयलूट करून नगर परिषदेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे.भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी जातीपातीचे पेरणी करून नागरिकांना आपापसात लढविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळेच पुसद शहराचा विकास खुंटला आहे आणि त्याचा विचका झाला आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील सर्वसामान्य जनतेला भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्यासाठी शहरातील समाजसेवेचे व्रत घेतलेल्या जागृत नागरिकांनी पुसद विकास मंचाची स्थापना करून येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदसह सर्व प्रभागांमध्ये नगरसेवक पदांसाठी उमेदवार उभे करणार असून शहरातील नागरिकांनी पुसद विकास मंचच्याच सर्व नगरसेवक नगराध्यक्षपदासाठी उभे असलेल्या उमेदवारांना निवडून देवुन एकहाती सत्ता देऊन शहराचा विकास घडवावा,” असे आवाहन पत्राकार परीषदेच्या माध्यमातूनॲड.अनिल ठाकुर यांनी शहरातील जनतेेलाा केले असून यांच पत्रकार परिषदेतून प्रस्थापितांना टोलाही लगावला आहे.परिवर्तनाची वेळ आहे; जनतेेेने साथ द्यावी..

आगामी नगरपरिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आज पुसद विकास मंचाच्या वतीने ॲड.अनिल ठाकूर यांनी हॉटेल अनुपप्रभा येथे सकाळी १२:०० वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराचा सर्वांगीक विकास व भ्रष्टाचार मुक्त प्रशासनासाठी पुसद विकास मंच हे नगराध्यक्षपदासह सर्व प्रभागामध्ये नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे करून ही निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. त्यावेळी ते बोलताना म्हणाले की, येथील प्रस्थापितांनी वर्षानुवर्षे एकहाती सत्ता असूनही या शहराचा विकास केला नाही “तुम्ही खा व आम्हालाही खाऊ द्या”या प्रवृत्तीमुळे शहराचा संपूर्ण विकास कुठला आहे. तर सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या नगर परिषदेत जनतेच्या कराच्या पैशाची लयलूट करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. आपल्या क्षेत्रात “झेंडे अनेक परंतु दंडा एक” या प्रवृत्तीमुळे शहरातील जनतेच्या विश्वासाला तडा गेला आहे. आता तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत बरेच राजकीय पक्षाचे सत्तेत आहेत परंतु त्यांनी या शहराच्या विकासाचा कधी विचार केला नाही.त्यामुळे या शहराची अवस्था बिकट आहे आगामी येणाऱ्या निवडणुकीसाठी परिवर्तनाची वेळ आहे; साथ द्या.. आपल्या सर्वांचे स्वप्न पूर्ण करून विश्वास जिंकण्यासाठी समाजसेवेचे लक्ष घेऊन आपल्या सेवेत येणार आहोत. आम्ही वचनबद्ध आहोत विकासासाठी व जनसेवेसाठी तसेच शहराच्या सार्वागिंण विकासासाठी आमच्या वचननाम्यामध्ये जनतेच्या हिताचे शंभर मुद्दे घेऊन या निवडणुकीला समोर जाणार आहेत.आम्ही स्वत: खाणार नाही, दुसऱ्यालाही खाऊ देणार नाही’, ‘भ्रष्टाचार करणार नाही, कोणालाही करू देणार नाही’ असे पुसद विकास मंचाचाचे धोरण असुन विकसित नगरपरिषदे पेक्षाही विकसित शहर बनविण्यासाठी प्रयत्न करीन व पुसद शहर स्वच्छ सुंदर आधुनिक शहर बनविण्याचे लक्ष ठेवून या निवडणुकीत उतरणार आहोत तसेच यावेळी ठाकूर यांनी पुसद नगर परिषदेचा येणाऱ्या काळात आर्थिक अंदाजपत्रक २ हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे आश्वासन देत शहराच्या संपूर्ण विकासासाठी १०० मुद्यांचा अजेंडा प्रसिद्धीला दिला. अतिक्रमण व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, बाजारपेठेचा विकास, दिल्ली, जपानसारख्या उत्तम शाळांची निर्मिती, एआय तसेच सीबीएससी पॅटर्ननुसार शिक्षण, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यासिका वाचनालय व मार्गदर्शकवर्ग सांस्कृतिक भवन प्रत्येक प्रभागात महिला-पुरुषासाठी अत्याधुनिक जिम, प्रशस्त क्रीडा संकुल, घरकुल योजनेतून झोपडीमुक्त शहर, सर्व लेआउट मधील मोकळ्या जागांचा विकास, शहरात सात अत्याधुनिक मॉल, एक हजार दुकान गाळेनिर्मिती, उद्योग, व्यवसायासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण, शुद्ध पेयजल पुरवठा, नगरपालिकेची नवीन प्रशस्त प्रशासकीय इमारत, नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी गृहनिर्माण, योग्य ठिकाणी ऑटो स्टॅन्ड, वाहन पार्किंग व्यवस्था, वाहतूक व्यवस्थेत सुधार, शहर हद्दवाढ, अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा, शहरात मोफत वायफाय सुविधा, पूस नदी स्वच्छता व पर्यटनस्थळ, नगरपालिकेची कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक विश्रामगृह, २ हजार युवक युवतींना नोकरी, सुंदर शहर स्वच्छ शहर, प्लास्टिक व प्रदूषणमुक्त शहर, अत्याधुनिक हॉस्पिटल, अत्याधुनिक ॲम्बुलन्स व्यवस्था, शहरातील अपूर्णावस्थेतील विविध सभागृह पूर्ण करणे, पत्रकार भवन, गोशाळा, शहराचे सांस्कृतिक वैभव वाढविणे, महिला युवकांसाठी आरोग्य शिबिरे, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, दिव्यांगाश्रम सुरू करणे, हेमाडपंथी मंदिरांचा जिर्णोद्धार या व इतर बाबिचा अजेंडामध्ये समावेश आहे. उत्सव तसेच समाजसेवेत सक्रिय असलेल्या युवकांचा पुसद विकास संघामध्ये समावेश करण्यात आला असून काही राजकीय पक्षातील वजनदार नेत्यांचा या मंचला पाठिंबा असून मी एक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून स्वतः अनिल ठाकूर हे नगराध्यक्ष पदासाठी मंचच्या वतीने स्वतः निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही राजकीय पक्षांसोबत मैत्रीचा मार्गही मोकळा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दारासिंग राणा, विश्वकर्मा व ॲड.अर्जुन ठाकूर ललीत चव्हाण उमेश जाजू उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close