क्राइम

नदीच्या पात्रात आढळलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश;पूर्ववैमान्याशातू खून केल्याचे निष्पन्न! 

पुसद: पुस नदीच्या पात्रातील तव्वकलशाह बाबा दर्ग्या जवळ दोन्ही हातपाय कपड्याने बांधलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचे रहस्य अवघ्या चार तासात उलगडण्यात पोलिसांना यश आले असून पूर्ववैमान्याशातू खून केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दोघासह एका अल्पवयीन आरोपींन पोलिसांनी अटक केली आहे.

अनिकेत रवी मस्के वय १८वर्ष रा.मुखेड चौक पुसद,अजय पंडित जोंगदडे वय २१वर्ष रा. आंबेडकर वार्ड पुसद, एक अल्पवयीन रा.आंबेडकर वार्ड पुसद,अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,दि.२३ ऑक्टोंबर२०२३ रोजी पुसद शहरातील येथील पुस नदीच्या पात्रात तव्वकलशाह बाबा दर्ग्या जवळ दोन्ही हातपाय कपड्याने बांधलेल्या अवस्थेत आढळलेल्या एका इसमाचे प्रेत अवस्थेत आढळून आले होते.पोलीसांना ओळख पटविण्यात यश आले होते. फिर्यादी शेख सलीम शेख युनूस वय ३६ वर्ष, रा. मच्छीमार्केट आंबेडकर वार्ड पुसद यांनी फिर्याद दिली की,दि. १४ आक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वा.चे सुमारास माझा लहान भाऊ शेख अजीम उर्फ बाबू हा घरातून एकटाच निघून गेला होता, तो घरी परत न आल्याने दि. १५ आक्टोंबर २०२३ रोजी पोलीस स्टेशन पुसद शहर येथे मिसींग रिपोर्ट दाखल केला होता. दि. २३ आक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वा.चे दरम्यान तवक्कलशह बाबा दरग्याजवळ पुस नदीचे पात्राजवळ पोलीस व लोक जमल्याने मी त्या ठिकाणी जावून पाहीले असता तेथे सडलेल्या अवस्थेत दोन्ही हात व पाय बाधून कपडयाने गळा अवळले स्थितीत मिळून आलेली लाश ही माझा भाऊ शेख आजीम उर्फ बाबु शेख युनुस वय २३ वर्ष याचीच ओळख पटली. माझा भाऊ शेख आजीम उर्फ बाबु शेख युनुस वय २३ वर्ष रा. आंबेडकर वॉर्ड पुसद यांस कोणीतरी अज्ञात इसमानी त्याचे दोन्ही हात व पाय बांधून कपडयाने गळा आवळून खून करून त्याची लाश मिळून येवू नये या करीता पुस नदी पात्राचे मधोमध गवतामध्ये फेकून देवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी फिर्यादी दिली होती. त्यावरून पोलिसांनी  सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड , अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप , सहायक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी पुसद पकंज अतुलकर यांना माहीती देवून त्यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे डी.बी.प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व स्टाफ यांनी तात्काळ घटनास्थळी जावून गोपनीय रित्या तसेच तांत्रिक दृष्टया सदर अज्ञात आरोपींचा शोध घेतला. मयत याचे सोबत घटनेच्या रात्री असलेल्या काही इसमा बाबत डि.बी.पथक यांना गोपनीय माहीती प्राप्त झाल्याने पोलीसांनी संशयित इसमाकडे सखोलरित्या पोलीसी खाक्या दाखवून विचारपूस केली असता आरोपी नामे अनिकेत रवि म्हस्के वय १८ वर्ष, रा.मुखरे चौक पुसद , अजय पंडीत जोगदंडे वय २१ वर्ष, रा. आंबेडकरवार्ड पुसद, एक अल्पवयीन रा.आंबेडकरवार्ड पुसद यांनी पूर्व वैमनस्यातून सदर गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यावरून पोलिसांनी पोलिसांनी आरोपी विरोधात पुसद शहर पोलीस स्टेशन अप.क्र. ७५०/२०२३ कलम ३०२, २०१ भा.द.वी. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपी ला अटक करण्यात आली असुन, यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला बालगृहात पाठविण्यात आले आहे.

        सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड साहेब, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप साहेब, सहायक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी पुसद पकंज अतुलकर यांचे मार्गदर्शनाखाली व पुसद शहर पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, सहा.पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार यांचे सुचना प्रमाणे डी.बी.प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक अनिल सावळे, पो.हवा. प्रफूल इंगोले, पो.हवा.सुनिल पवार, पो.ना. दिनेश सोळंके, पो.ना.मनोज कदम, पो.ना.ज्ञानेश्वर कराळे, पो.कॉ. आकाश बाभूळकर, पो.कॉ. शुध्दोधन भगत, पो.कॉ.वैजनाथ पवार, चा.पो.ना.सुनिल ठोंबरे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक गणेश इंगोले हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close