ईतर

माणुसकीचे भिंत सोशल फाउंडेशनच्या महिला सदस्यांया वतीने आगळे वेगळे हळदीकुंकू!

पुसद:मकर संक्रांत हा सण सामाजिक एकता, माणुसकी जपणारा म्हणून या सणाकडे पाहिलं जातं, तिळगुळ घ्या गोड बोला, सांगत हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात, माणुसकीची भिंत महिला सदस्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मकर संक्रात हळदी कुंकवाच्या सणानिमित्त उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे भरती असलेल्या नवजात शिशूंच्या मातांना वाण म्हणून राजमाता जिजाऊ, भारतातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, माता रमाई यांची पुस्तके, भगिनींना साडी,मुलांना कपडे, वाण म्हणून भेट देण्यात आली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे, यावेळेस माणुसकीची भिंत महिला सदस्यां मोनिका गजानन जाधव यांनी राजमाता जिजाऊ क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले माता रमाई यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आम्ही सर्व माणुसकीची भिंत महिला सदस्य मागील सात वर्षापासून कार्य करत आहेत. हळदी कुंकवाच्या उपक्रमाच्या माध्यमातून थोर महिलांचे विचार सर्व सामान्य महिलांपर्यंत पोहचावे यासाठी आम्ही सर्व महिला कार्य करत आहेत, असे मनोगत व्यक्त केले.

“ज्ञानाचे वाण” वाणा मध्ये कोणती वस्तू न देता,त्यांना थोर महिलांची पुस्तके वान म्हणून देण्यात आली, या उपक्रमाकरिता माणुसकीची भिंत महिला सदस्यांनी स्वतः पैसे जमा करून हळदी कुंकवाचा आगळा वेगळा उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला यावेळेसमोनिका जाधव,स्वाती वाठ, रेखा आगलावे,कामिनी चतुर,शिवानी नरवाडे,अर्चना गावंडे,प्रियंका बेले,पूजा इंगोले,मेघा गावंडे,साधनां ठाकरे,पद्माताई येल्लेकर, संध्या महल्ले, व माणुसकीच्या भिंतीचे सदस्य उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close