ईतर

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, कोळसा येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरा..

हिंगोली /प्रतिनिधी (शिवाजी कऱ्हाळे) : दि.१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्रामदिन विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी ठिक ७:३० वाजता संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ,उपाध्यक्षा श्रीमती आनंदीताई बेंगाळ, सचिव श्री अंकुशराव बेंगाळ, दिपकराव फटांगळे (नगरसेवक, सेनगाव) कवी व्याख्याते श्रीनिवास मस्के (बहिर्जी स्मारक विद्यालय,गिरगाव), गोविंद कह्राळे सर,कवी शिवाजीराव कह्राळे, विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ, मंचकराव बेंगाळ,प्रा. प्रकाशराव शिंदे पाटील, मस्के महाराज, किसनराव संत, दत्तराव जगताप,शिवाजीराव ठोंबरे, नसीबभाई, रामेश्वर पोले, संतोष नागलगे, तसेच प्रशांत पाईकराव प्रस्तुत सुरसंगम संगित कार्यक्रम यांची टीम,मुख्याध्यापक शिंदे आर.बी. मुख्याध्यापक सरकटे व्ही.एस. पर्यवेक्षक कसाब पी.पी. ही मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.

यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला व विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाचे खेळाडू तालुका पातळीवर प्रथम क्रमांक आल्यामुळे संस्थेच्या वतीने खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तसेच कै. रामराव पाटील अध्यापक विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम कु.ढगे वैष्णवी माधव,द्वितीय कु.फटांगळे तेजस्विनी माधव,तृतीय उगले रोशनी दत्ता यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. ” मराठवाडा मुक्ती संग्रामाचा धगधगता इतिहास”*या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.यामध्ये प्रथम आल्याबद्दल कु.ऋतुजा राजू बेंगाळ या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.अनिरुद्ध घुगे कोतवाल परीक्षा पास झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी माटे सर यांनी प्रास्ताविकपर मनोगतांमध्ये मराठवाड्याचा संपूर्ण इतिहास विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर उभा केला.यावेळी मराठवाडा गीत कोमल चोपडे, पुजा साठे यांनी गायले. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच गोविंदराव कह्राळे सरांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त आपले विचार प्रकट केले. तसेच कवी व व्याख्याते श्रीनिवास मस्के सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मधुर वाणी मधून मराठवाड्याला अनेक समस्या व अडचणीतून जावे लागले त्यामुळे या अमृत महोत्सवा निमित्त मराठवाडा कसा मुक्त झाला या विषयावर आपले विचार कवीतेतुन मांडले. तसेच त्यांनी निसर्ग कविता, तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कविता म्हणून दाखवल्या त्यामध्ये “आईचं जगणं, बाईचं जगणं”,” तिच्या काळजाला भेग”, “जु घेतल जीवावर” असे माय- माऊली चे वर्णन केले. आपल्या माय-बापांनी आपल्यावर अनंत उपकार केले आहे. आपल्याला आपल्या आई-वडिलांच्या कर्तव्याची जाणीव असली पाहिजेत,” पंख फुटलय या उडीन गेलं या” मुल शिकुण मोठ्या पदावर नौकरीला लागल्यानंतर आपल्या आई- वडिलांना अनाथ आश्रमामध्ये ठेवतात.ही शोकांतिका त्यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केली.  तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेबांनी विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी संगीत सुर-संगम कार्यक्रमाचे आयोजन केले.तसेच त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोप मधून संस्थेने मान्यता मिळवलेल्या नवीन युनिट विषयी माहिती दिली.तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम या विषयावर आपले विचार प्रगट करून उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.यावेळी सुत्रसंचालन शिंदे आर.बी. यांनी केले व आभार श्री काळे बी.के.यांनी मांनले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, परिसरातील पालक व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close