महाराष्ट्राचे राज्यमंत्री ना.ॲड.इंद्रनीलभाऊ नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त पुसद येथे कुस्त्यांची भव्य दंगल; दहा लाख रुपयांची जंगी लूट!

पुसद : महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना.ॲड. इंद्रनील मनोरराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२७ जानेवारी२०२५ रोजी येथील पूस नदीच्या काठावरील बांधाजवळ सकाळी ९:०० ते रात्री८:०० वाजेपर्यंत कुस्त्यांची भव्य दंगल आयोजित करण्यात येणार असून सुमारे दहा लाखांची जंगी लूट ठेवण्यात आली आहे. अशी माहिती आज शासकीय विश्रामगृह पुसद येथे झालेल्या आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे. पुसद येथील तालीम कुस्तीगीर असोसिएशन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री नामदार ॲड .इंद्रनील मनोहरराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि२७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत कुस्त्यांची भव्य दंगल आयोजित करण्यात आली आहे सकाळी ११:०० वाजल्यापासून नंबरच्या कुस्त्यांचे जोड बांधण्यात येतील या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माजी जि. प. उपाध्यक्ष तथा बा.ना. सूतगिरणी उपाध्यक्ष ययाती नाईक तर विशेष अतिथी म्हणून श्री क्षेत्र माहूरगड येथील योगी शाम भारती महाराज , प्रमुख पाहुणे अनसिंग येथील विजय राधेश्यामजी महाराज, कासोळा देव येथील प .पु.सद्गुरु गजानंद महाराज, शामराव हनमंता सातपुते महाराज, बालयोगी गोपाल महाराज, डॉ. बाबुराव साखरे, निशांत बयास, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कुस्ती दंगल मैदानाला भारतातील नामवंत पैलवान हजेरी लावणार असून हरियाणा, दिल्ली, पुणे ,कोल्हापूर, सांगली, सातारा ,हिंगोली, वाशिम, यवतमाळ ,अमरावती, वर्धा आदी शहरातील पैलवान हजर राहणार आहेत. तसेच पहिल्या क्रमांकाच्या विजयी होणाऱ्या पैलवानास रुपये १ लाख रोख रकमेसह चांदीची गदा देण्यात येणार आहे.स्व. आर. डी. राठोड यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुधीर राठोड व शुभम भडांगे उपसरपंच बोरगडी यांचे तर्फे चांदीची गदा देण्यात येईल तसेच दुसऱ्या क्रमांकाच्या पैलवानास रोख रक्कम रुपये ७१ हजार व स्व. खंडूजी कवडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राजू कवडे यांच्यातर्फे चांदीची गदा देण्यात येईल. तसेच सम्राट झरकर यांच्याकडून येणाऱ्या पाहुण्यांना फेटे बांधण्यात येणार आहेत. या कुस्त्याच्या दंगलीमध्ये एकूण१ते ३६ बक्षीस ठेवण्यात आले आहे या भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आधारस्तंभ जगदीश जाधव, सुधीर राठोड, अशोक मामा बनचरे व सुभाष चव्हाण हे असून कुस्ती दंगलीचे आयोजक पै .गणेश भिसे, पै .अमोल साखरे, शिवाजी शिंदे, राजाराम काळे, गजानन जाधव, अवधूत कदम, स्वप्निल नादरे ,प्रेम पौळ, पै ज्ञानेश्वर गादेकर, पै गणेश खोलगडे व रवि राय हे आहेत. या कुस्ती दंगलीचे सूत्रसंचालक पै. अमोल साखरे व अरुण जाधव हे करणार असल्याची माहिती आज २४ जानेवारी २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह पुसद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे-कुस्ती खेळणाऱ्या पैहलवानाच्या जीवित्वाची जबाबदारी ज्यांची त्यांच्यावर राहील कार्यक्रमात फेरबदल करण्याचा अधिकार आयोजक मंडळाकडे राहील पंचाचा निर्णय अंतिम राहील तसेच विजयी पैलवानाच्या सर्व बक्षीस मधून २०% रक्कम उपविजयी पैहलवानास देण्यात येईल..



