अवैधरित्या साठवणूक केलेला अंदाजे दीडशे ते दोनशे ब्रास रेती साठा जप्त!महसूल विभागाच्या या तीन दिवसातील दुसऱ्या कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले!

पुसद : शहरासह तालुक्यात रेती तस्करी मोठ्या प्रमाणात प्रकाशझोतात येताना दिसत आहे त्यामुळे महसूल यंत्रणा ‘अॅक्शन मोड’वर आली असून दोन-तीन दिवसापूर्वी अशाच रेतीसाठ्यावर धाड टाकून कारवाई केली होती ही घटना ताजी असताना सुद्धा आज पुन्हा श्रीरामपूर येथील बंजारा हिल चल ले-आउट मध्ये अवैधरित्या काळ्या रेतीची तस्करी करण्याच्या उद्देशाने काळ्या रेतीचा साठा केला असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाने जवळपास १२० ब्रास एवढा रेतीसाठा जप्त केला आहे परंतु प्रथमदर्शनीच्या मते हा अवैध रेतीचा साठा जवळपास २०० ते २५० ब्रास असावा असा कयास लावला जात आहे परंतु महसूल विभागाचे संबंधित कर्मचारी अवैधरीची आरतीचा साठा करणाऱ्या रेती तस्कराला अभय देत असले तरीही महसूल विभागाच्या या दोन-तीन दिवसातील दोन कारवाईमुळे तालुक्यातील रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. परंतु ज्या महसूल विभागाची या गौणखणीजावर देखरेख आहे. त्याच महसूल विभागाला हे रेती तस्कर कोट्यावधी रुपयाचा चुना लावत आहेत तर स्थानिक महसूल प्रशासनातील आणि पोलीस प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्याचे या रेती तस्करासी अत्यंत गोड संबंध असल्यामुळे ‘मिठाईच्या’ बॉक्स पेटी मधून दरमहा अर्थपूर्ण सबंध जोपासली जात आहे. जर या महसूल कर्मचाऱ्यांचे आणि काही पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनीचे सीडीआर तपासले असल्यास मोठे घबाड उघडे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरासह तालुक्यात या रेती तस्करांचे मनोबल वाढले असल्याने दिवस-रात्र खुलेआम होत असलेल्या रेती तस्करीला महसूल विभागाने व पोलीस प्रशासनाने खुली सूट दिल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे तालुक्यासह शहरही अवैध रेती तस्करीचा अड्डा झाला आहे की काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद शहरासह तालुक्यात अवैधरीत्या रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या अवैधरीत्या रीती तस्करींना आळा बसावा यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार सरसावले आहे याचीच दखल घेऊन महसूल प्रशासनाने या दोन-तीन दिवसात लगातार अवैद्रीच्या रेती तस्करी करणाऱ्या धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. पुसद उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपविभागात रेती तस्करीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्याला आदेश दिल्याने पुसद तालुका दंडाधिकारी यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याला तात्काळ धाडसत्र सुरू करण्याचे आदेश दिले त्यावेळी नायब तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली एक पथक तयार करून शहरालगत असलेल्या श्रीरामपूर येथे दोन-तीन दिवसांपूर्वी धाड टाकून रेती साठा जप्त करण्यात आला होता ही कारवाई ताजी असताना सुद्धा पुन्हा दि.३०मार्च २०२६रोजी सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास त्याच रेती साठ्याच्या बाजूला असलेल्या दीडशे ते दोनशे ब्रास काळ्या रेती साठ्याच्या यावर धाड टाकू ही रेती जप्त करून पंचनामा करण्यात आली आहे.
ह्य अवैध्य रेतीसाठा असल्याची माहिती प्राप्त होताच महसूल अधिकारी – कर्मचारी या पथकास सोबत घेऊन सखोल चौकशी केली असता येथील एका बंजारा हिल ले-आउट मध्ये रेती तस्करांनी अवैधरित्या साठ करून रेतीचा साठा केला असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे महसूल विभागाकडून तहसीलदार रेखाताई वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार योगेश गाडे,मंडळ अधिकारी तलाठी निरंजन वानखेडे, गोपीनाथ इंगोले, राहुल खाडे,व अदि महसूल प्रशासनाचे कर्मचाऱ्यांनी ही जप्तीची कारवाई केली असल्याची महसूल विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली आहे.



